"खिचडीत पाणी मिसळून १२ लोक खात होतो...", गरीबीतले दिवस आठवून रवि किशन झाले भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 17:14 IST2025-01-03T17:13:31+5:302025-01-03T17:14:03+5:30

Ravi Kishan : रवी किशन हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'लापता लेडीज'मधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. याशिवाय त्यांची 'मामला लीगल है' ही वेबसीरिजही खूप चर्चेत होती.

"12 people were eating khichdi mixed with water...", Ravi Kishan gets emotional remembering his days of poverty | "खिचडीत पाणी मिसळून १२ लोक खात होतो...", गरीबीतले दिवस आठवून रवि किशन झाले भावुक

"खिचडीत पाणी मिसळून १२ लोक खात होतो...", गरीबीतले दिवस आठवून रवि किशन झाले भावुक

रवी किशन हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. २०२४ मध्ये रिलीज झालेल्या 'लापता लेडीज'मधील त्यांच्या कामाचे खूप कौतुक झाले. याशिवाय त्यांची 'मामला लीगल है' ही वेबसीरिजही खूप चर्चेत होती. नुकतेच रवी किशन यांनी त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले, जे अत्यंत गरिबीत गेले. त्यांनी सांगितले की ते अत्यंत गरिबीत वाढले, मातीच्या घरात राहत होते आणि १२ लोक खिचडीत पाणी मिसळून खात होते. आता यशस्वी असूनही, ते अजूनही महागड्या रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देण्यासाठी घाबरतात, कारण त्यांच्या मध्यमवर्गीय सवयी अजूनही त्यांच्यासोबत आहेत.

शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान रवी किशन यांनी सांगितले की, ते मोठ्या कष्टाने गरिबीतून बाहेर आले आहेत. ते म्हणाले की, 'मी इतकी गरिबी पाहिली आहे की आजही मी ७ स्टार हॉटेलमध्ये चांगले जेवण ऑर्डर करत नाही. मग तो प्रोडक्शनचा पैसा असो किंवा माझा पैसा. आताही खिचडी ऑर्डर करतो. लाँड्रीला कपडे द्यायला संकोच करतो. मला वाटते माझे कपडे घरीच धुता येतील. ती गरिबी अजूनही माझ्या मनात आहे आणि माझ्या नसनसात भिनली आहे. तो मध्यमवर्ग माझ्यातून बाहेर पडत नाही.

एकाच ताटात १२ जण खिचडी खात असत
रवी किशन यांनी सांगितले की, ते एका मातीच्या घरात राहत होते. मुंबईत आल्यावर शेत गहाण ठेवली होती. चहा आणि वडापाव खाऊन दिवस काढले आहेत. १५ वर्षे मानधनाशिवाय चित्रपटात काम केले. ते म्हणाले की, 'मी खूप गरिबी पाहिली आहे. आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. आमची शेतजमीन गहाण ठेवली होती. सर्व काही नष्ट झाले. मी अत्यंत गरिबी पाहिली आहे. अशी गरिबी जिथे १२ लोक एक खिचडी पाण्यात मिसळून खायचे.

रवी किशन यांचा हजारो वेळा झालाय अपमान
रवी किशन पुढे म्हणाले, 'मला अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागला आहे. लोकांचा दोन-चार वेळा अपमान होतो, मी हजारोवेळा सामना केला आहे. त्यांच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण करून देताना रवी किशन म्हणाले की त्यांना सिने पार्श्वभूमी नव्हती आणि त्यांना इंग्रजी येत नाही. या पदावर पोहोचल्यानंतर त्यांना ज्यांनी अपमान केला त्याबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही.
 

Web Title: "12 people were eating khichdi mixed with water...", Ravi Kishan gets emotional remembering his days of poverty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.