मुंबई पोलिसांच्या इव्हेंटसाठी सलमान-शाहरुख किती पैसे घेतात? '12th Fail' IPS मनोज कुमार यांनी केली पोलखोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 01:08 PM2024-01-11T13:08:40+5:302024-01-11T13:10:08+5:30
मुंबई पोलिसांच्या इव्हेंटमध्ये हजेरी लावण्यासाठी टॉप बॉलिवूड सेलिब्रिटी किती पैसे घेतात? याचा खुलासा मनोज कुमार यांनी केला आहे.
12th Fail या बॉलिवूड सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. विक्रांत मेसी मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्षकथेवर भाष्य करण्यात आलं आहे. १२वीत नापास होऊनही स्पर्धा परिक्षेचं धनुष्य उचलून आपलं लक्ष्य गाठणाऱ्या IPS अधिकारी मनोज कुमार यांची प्रेरणादायी कथा 12th Fail सिनेमातून दाखविण्यात आली आहे. 12th Failच्या यशानंतर विक्रांत मेसीबरोबरच मनोज कुमारही चर्चेत आले आहेत.
12th Fail सिनेमाच्या सक्सेसनंतर मनोज कुमार अनेक ठिकाणी मुलाखती देत आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी वैयक्तिक आयुष्य, कठीण काळ याबाबत भाष्य केलं. मनोज शर्मा यांनी नुकतीच 'लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी पोलीस इव्हेंटदरम्यान बॉलिवूड अभिनेत्यांबरोबरचा अनुभवही सांगितला. याबरोबरच या इव्हेंटमध्ये हजेरी लावण्यासाठी टॉप बॉलिवूड सेलिब्रिटी किती पैसे घेतात, याचा खुलासाही मनोज कुमार यांनी या मुलाखतीत केला.
मुंबई पोलिसांच्या उमंग या इव्हेंटसाठी मनोज कुमार यांनी काम केलं आहे. मुंबई पोलिसांच्या कामाप्रती सन्मान आणि त्यांच्या कल्याणासाठी हा इव्हेंट घेतला जातो. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या इव्हेंटसाठी हजेरी लावतात. या इव्हेंटदरम्यान मनोज कुमार यांचीही बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर गाठभेट झाली होती. "सगळे मोठे सेलिब्रिटी केवळ मुंबई पोलिसांच्या आमंत्रणाचा मान ठेवून या इव्हेंटला हजेरी लावतात. या इव्हेंटमध्ये येण्यासाठी ते कोणत्याही प्रकारची फी घेत नाहीत. फ्रीमध्ये ते हे फंक्शन अटेंड करतात," असं ते म्हणाले.
पुढे मनोज कुमार म्हणाले, "अमिताभ बच्चन, सलमान खान, आमिर खान, रणवीर सिंग, शाहरुख खान सगळे जण येतात. हा कार्यक्रम ५ तास चालतो." दरम्यान, 12th Fail हा सिनेमा आता ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. हॉटस्टारवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. थिएटर गाजवल्यानंतर आता 12th Fail सिनेमाला ओटीटीवरही चांगला प्रतिसाद मिळत आहे.