सेन्सॉर बोर्डाने अनारकली आॅफ आरासाठी सुचविले १३ कट्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2017 11:18 AM2017-03-07T11:18:02+5:302017-03-07T16:48:02+5:30

स्वरा भास्करच्या येत्या अनारकली आॅफ आरासाठी सेन्सॉर बोर्डाने १३ कट्स सुचविले आहेत. चित्रपट निर्माते संदीप कपूर यांनी पीटीआयशी बोलताना ...

13 cuts suggested by Censor Board for Anarkali of the Aara | सेन्सॉर बोर्डाने अनारकली आॅफ आरासाठी सुचविले १३ कट्स

सेन्सॉर बोर्डाने अनारकली आॅफ आरासाठी सुचविले १३ कट्स

googlenewsNext
वरा भास्करच्या येत्या अनारकली आॅफ आरासाठी सेन्सॉर बोर्डाने १३ कट्स सुचविले आहेत. चित्रपट निर्माते संदीप कपूर यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली.
या चित्रपटातील ११ दृष्यांसह चित्रपटातील अभिनेत्यांची अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी ही नावेही बदलण्यास सांगण्यात आली आहेत. सेन्सॉर बोर्डाने ११ कट सुचविले असून, यात एका बोल्ड सीनचाही समावेश आहे. सेन्सॉर बोर्डाने आम्हाला अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी (एका संवादामध्ये) ही नावेही कमी करण्यास सांगितली आहेत. एका शायरीमध्ये येणारे अर्जुन हे नावदेखील कमी करण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या मते यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातील. यामुळे दर्शकांना काही गोष्टी समजण्यास कठीण जातील, असेही संदीप कपूर यांनी सांगितले.
संदीप कपूर यांच्या अनुसार सेन्सॉर बोर्डाविरूद्ध लढण्यास त्यांची तयारी नाही. तथापि या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश दास आणि इतर कलाकार याविरूद्ध आहेत. एक स्वतंत्र निर्माता म्हणून सेन्सॉर बोर्डाशी लढण्यास मी तयार नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकार हे या कट्सविरोधात आहेत. ही अत्यंत बोल्ड आणि पॉवरफुल चित्रपट आहे, परंतू भाषा अश्लील नाही.
उडता पंजाबचे उदाहरण देताना संदीप यांनी सांगितले की सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या नावासह एकूण ८९ बदल करण्यास सांगितले होते. मी अनेक मोठ्या निर्मात्यांनी चित्रपटात बदल केल्याचे पाहिले आहे. उडता पंजाबबाबत काय झाले? हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि यामुळे निर्मिती मारली जाते याचे दु:ख असल्याचेही तो म्हणाला.
चित्रपटातील काही दृष्ये लीक झाल्याचे प्रकरण पोलिसांमध्ये आहे. ते योग्य पद्धतीने तपास करीत आहेत. पुढे काही घडू नये यासाठी आम्ही मद्रास उच्च न्यायालयात  याचिका दाखल केली आहे. यामुळे पायरेटेड कॉपीज बाजारात आणि संकेतस्थळावर येणार नाहीत, अशी आमची अपेक्षा आहे.


Web Title: 13 cuts suggested by Censor Board for Anarkali of the Aara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.