'१६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...'; कंगना राणौतची 'ती' पोस्ट आली चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 11:52 AM2022-04-29T11:52:44+5:302022-04-29T11:53:10+5:30

Kangana Ranaut: कंगना राणौतची सोशल मीडियावरील लेटेस्ट पोस्ट व्हायरल होताना दिसत आहेत.

'16 years ago today ... '; Kangana Ranaut's post came up in the discussion | '१६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...'; कंगना राणौतची 'ती' पोस्ट आली चर्चेत

'१६ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...'; कंगना राणौतची 'ती' पोस्ट आली चर्चेत

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) तिच्या रिअॅलिटी शो 'लॉक अप'मुळे सतत चर्चेत असते. कंगनाच्या शोशी संबंधित दररोज काही ना काही व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतात. त्याचवेळी कंगना राणौतने लाल रंगाच्या ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो शेअर केली आहे. त्यासोबत तिने भली मोठी पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कंगना राणौतने 'गँगस्टर' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हा चित्रपट २००६ मध्ये २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन १६ वर्षे झाली आहेत. या चित्रपटाला तिच्या बॉलिवूड जर्नीशी जोडत कंगना राणौतने एक पोस्ट केली आहे जी व्हायरल होत आहे. कंगना रणौतने इंस्टाग्रामवर लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर करत लिहिले की, '१६ वर्षांपूर्वी या दिवशी म्हणजेच २८ एप्रिल २००६ रोजी गँगस्टर रिलीज झाला आणि मी अभिनेत्री म्हणून माझा प्रवास सुरू केला.'
यासोबत, अभिनेत्रीने पुढे लिहिले- 'आज, २८ एप्रिल २०२२ रोजी, प्राइम व्हिडिओचा पाचवा वर्धापन दिन साजरा करताना, मी मणिकर्णिका फिल्म्सची पहिली निर्मिती 'टिकू वेड्स शेरू' लाँच केली. याच दिवशी मी निर्माती म्हणून माझा प्रवास सुरू करत आहे. प्राइम व्हिडिओचे खूप खूप आभार.


कंगना राणौतची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. कंगनाच्या पोस्टच नाही तर तिच्या फोटोंनीही सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोत कंगनाने लाल रंगाच्या ट्राउजर सोबत त्याच रंगाचा कोट परिधान केला आहे. यासोबत कोटच्या आत तिने लाल रंगाचा शिमरी क्रॉप टॉप घातला आहे. या टॉपने तिच्या लूकला चारचाँद लावले आहेत.

Web Title: '16 years ago today ... '; Kangana Ranaut's post came up in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.