17 March 2017 : ‘सरकार 3’ची रिलीज डेट जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 06:33 PM2016-11-25T18:33:26+5:302016-11-25T19:36:37+5:30

दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘बॉलिवूडचे महानायक’ बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सरकार ३’ ...

17 March 2017: Release date for 'Government 3' | 17 March 2017 : ‘सरकार 3’ची रिलीज डेट जाहीर

17 March 2017 : ‘सरकार 3’ची रिलीज डेट जाहीर

googlenewsNext
ग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या आगामी ‘बॉलिवूडचे महानायक’ बिग बी अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सरकार ३’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट १७ मार्च २०१७ रोजी देशभरात रिलीज केला जाणार आहे. 

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाहून ‘सरकार ३’ ची शूटिंग पूर्ण झाली असून, अमिताभ बच्चनसोबतचे फोटो ट्विटरवरून शेअर केले होते. यामुळे हा चित्रपट लवकरच प्रदर्शित केला जाणार असल्याचा अंदाज लावण्यात येत होता.  आता हा चित्रपट १७ मार्च रोजी प्रदर्शित केला जाणार आहे असे सांगितले आहे. 

२००५ साली प्रदर्शित झालेल्या ‘सरकार’ या चित्रपटाचा २००८ साली ‘सरकार राज’ नावाने सिक्वल प्रदर्शित करण्यात आला होता. हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरले होते. या चित्रपटाच्या दोन्ही भागात अमिताभ बच्चन यांची प्रमुख भूमिका होती. ‘सरकार’ चित्रपटाची मालिका राजकारण व गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. याच मालिकेतील राम गोपाल वर्मा यांच्या ‘सरकार ३’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाली असून, पोस्ट प्रोडक्शनच्या कामाला सुरूवात झाली आहे. 

17 March 2017; Sakar relesed date

‘सरकार ३’मध्ये अमिताभ बच्चनसह मनोज वाजपेयी, जॅकी श्रॉफ, यामी गौतम व रोनित रॉय यांच्या भूमिका आहेत. सरकारमध्ये अमिताभ बच्चन सुभाष नागरेच्या भूमिकेत दिसणार आहे. यासोबतच अमित साध याने यात महत्त्वाची भूमिका केली असून, तो अमिताभ यांचा नातू दाखविण्यात आला आहे. रोनित रॉय ‘गोकुल साटम’ ही भूमिका करणार आहे. विशेष म्हणजे  ‘सरकार ३’मध्ये मनोज वाजपेयीची साकारत असलेली भूमिका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी साम्य असणारी आहे. यात खलनायकाची भूमिका जॅकी श्रॉफ करणार असून त्यांचा ‘सर’ म्हणून उल्लेख केला जाणार आहे. 

Web Title: 17 March 2017: Release date for 'Government 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.