​सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’मधून कापले १९ मिनिटं! वाचा काय आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2017 07:50 AM2017-06-19T07:50:48+5:302017-06-19T13:20:48+5:30

येत्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा २ तास ३५ मिनिटांना आहे, हे तुम्ही वाचले असेलच. ...

19 minutes cut in Salman Khan's 'tubelight' Read what is the reason !! | ​सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’मधून कापले १९ मिनिटं! वाचा काय आहे कारण!!

​सलमान खानच्या ‘ट्यूबलाईट’मधून कापले १९ मिनिटं! वाचा काय आहे कारण!!

googlenewsNext
त्या आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणारा सलमान खानचा ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा २ तास ३५ मिनिटांना आहे, हे तुम्ही वाचले असेलच. पण आता असे नसेल. होय, कारण मेकर्सनी आपला प्लान बदललाय. होय, आता हा चित्रपट २ तास १६ मिनिटांचा असेल.
खरे तर कबीर खानचा चित्रपट म्हटल्यावर तो दोन तासांपेक्षा अधिक लांबच असणार. त्याचा यापूर्वीचा ‘बजरंगी भाईजान’ हा जवळपास ३ तासांचा चित्रपट होता. तरिही प्रेक्षक या चित्रपटाला कंटाळने नव्हते. ऊलट हा चित्रपट सुपर डुपर हिट ठरला होता. पण ‘ट्यूबलाईट’ची वेळ कमी करण्यात आली आहे. आधी ‘ट्यूबलाईट’ एडिट केला गेला. एडिट करून हा चित्रपट २ तास ३५ मिनिटांचा झाला. पण रिलीजच्या तोंडावर तो पुन्हा रिएडिट केला गेला. रिएडिटनंतर या चित्रपटाची लांबी २ तास १६ मिनिट झाली असल्याचे कळतेय. यामुळे ‘ट्यूबलाईट’ला बराच फायदा मिळेल, अशी आशा केली जात आहे. कारण मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांना मोठ्या लांबीचे सिनेमे पाहताना कंटाळा येतो. मल्टिप्लेक्सच्या प्रेक्षकांचा विचार केला तर ‘ट्यूबलाईट’ची २ तास १६ मिनिटांची लांबी अगदी परफेक्ट आहे.

ALSO READ : न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवरही सलमानच्या ‘ट्यूबलाईट’चा प्रकाश

विशेष म्हणजे, मेकर्सच्या या निर्णयानंतर ‘ट्यूबलाईट’ हा सलमानचा अलीकडचा सर्वांत कमी लांबीचा सिनेमा असेल. कारण त्याचा ‘ट्यूबलाईट’पूर्वी रिलीज झालेला ‘सुल्तान’ २ तास ५० मिनिटांचा होता. ‘बजरंगी भाईजान’ २ तास ४३ मिनिटांचा होता. तर ‘प्रेम रतन धन पायो’ ३ तासांपेक्षाही मोठा होता. ‘ट्यूबलाईट’मधील या नव्या बदलाचा मेकर्सला किती फायदा होईल, ते लवकरच दिसेल. तूर्तास सलमानचे चाहते या चित्रपटाची आतूरतेने प्रतीक्षा करत आहेत, हे सांगणे नकोच.

Web Title: 19 minutes cut in Salman Khan's 'tubelight' Read what is the reason !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.