​1921 : पुन्हा एक हॉरर सिनेमा...पाहा ट्रेलर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2017 10:27 AM2017-12-11T10:27:09+5:302017-12-11T15:57:09+5:30

‘राज’,‘राज रिबूट’,‘३डी’,‘१९२०’ यासारखे अनेक हॉरर सिनेमे देणारे बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट पुन्हा एकदा एक हॉरर सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे, ‘१९२१’.

1921: Again a horror movie ... Watch the Trailer !! | ​1921 : पुन्हा एक हॉरर सिनेमा...पाहा ट्रेलर!!

​1921 : पुन्हा एक हॉरर सिनेमा...पाहा ट्रेलर!!

googlenewsNext
ाज’,‘राज रिबूट’,‘३डी’,‘१९२०’ यासारखे अनेक हॉरर सिनेमे देणारे बॉलिवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट पुन्हा एकदा एक हॉरर सिनेमा घेऊन येत आहेत. या चित्रपटाचे नाव आहे, ‘१९२१’. ‘१९२१’चा ट्रेलर आज रिलीज झाला.   या चित्रपटात अभिनेत्री जरीन खान आणि करण कुंद्रा मुख्य भूमिकेत आहेत.



‘१९२१’ हा चित्रपट बॉलिवूडच्या आत्तापर्यंतच्या भयपटांमध्ये एक नवा आदर्श निर्माण करेल, असा दावा विक्रम भट्ट यांनी केला आहे.  या चित्रपटाचे शूटींग गत आॅगस्टमध्येच संपले. चित्रपटातील पात्र त्यांचा वर्तमान सुरक्षित करण्यासाठी भूतकाळातील अनेक रहस्यांशी सामना करताना दिसणार आहेत. जीवन आणि मृत्यू यातील संघर्ष यात दिसणार आहे. हा चित्रपट‘१९२०’चा सीक्वल आहे. ‘१९२०’प्रमाणेच या चित्रपटात एक रोमॅन्टिक आणि इमोशनल कथा पे्रक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच जरीन खानचा ‘अक्सर2’ रिलीज झाला. मात्र हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. आता जरीन एक भयपट घेऊन येत आहे. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांना किती भावतो, ते बघूच. तोपर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर आपण बघुयात.
या चित्रपटात विक्रम भट्ट एलईडी लाईट्सवाला भूत दाखवणार आहे. यात भूताचा चेहरा दिसत नाही तर केवळ त्याच्या डोळ्यांत प्रकाश दिसतो. आता हा भूत पाहून तुम्ही हसता की घाबरता, हे तुमच्यावर अवलंबून आहे.
विक्रम भट्ट यांनी सन २००२ मध्ये ‘राज’पासून भयपटांची सुरुवात केली होती. ‘राज’ या चित्रपटात बिपाशा बसू आणि डिनो मोरिया लीड रोलमध्ये होते. २००८ मध्ये विक्रम यांचा ‘१९२०’ रिलीज झाला होता. २०१० मध्ये ‘शापित’ आणि २०११ मध्ये ‘हॉन्टेड’ हा पहिला ३ डी हॉरर सिनेमा विक्रम भट्ट घेऊन आले होते.  

Web Title: 1921: Again a horror movie ... Watch the Trailer !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.