बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 19:51 IST2018-12-11T19:46:36+5:302018-12-11T19:51:34+5:30
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड तयार करतो आहे. या सिनेमाने फक्त देशात नाही तर विदेशात देखील चांगला गल्ला जमावला आहे.

बॉक्स ऑफिसवर दिसला '2.0'चा दबदबा, 'पद्मावत' आणि 'संजू'चा ही मोडला रेकॉर्ड
साऊथचा सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या 2.0 सिनेमा बॉक्स ऑफिसवर रोज नवे रेकॉर्ड तयार करतो आहे. या सिनेमाने फक्त देशात नाही तर विदेशात देखील चांगला गल्ला जमावला आहे. या सिनेमाला रिलीज होऊन 11 दिवस झाले आहे. आतापर्यंत या सिनेमाने वर्ल्डवाईड 620 कोटींचा बिझनेस केला आहे.
रजनीकांत यांच्या '2.0'ने अनेक सिनेमाना मागे टाकले आहे. या सिनेमाने रणबीर कपूरच्या संजू आणि संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावत सिनेमांना देखील मागे टाकले आहे. संजूने 11 दिवसांत 542 कोटींचा गल्ला जमावला होता तर पद्मावतने 560 कोटींची कमाई केली होती. दोनही सिनेमा 2018चे बॉक्स ऑफिसवरचे बादशाह ठरले होते.
2.0 हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. केवळ सिनेमाच्या व्हीएफएक्सवर 550 कोटींचा खर्च करण्यात आला आहे. या सिनेमात रजनीकांत यांनी चिट्टी रोबोटची भूमिका साकारली असून अक्षय पहिल्यांदाच या चित्रपटाद्वारे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाच्या निमित्ताने अक्षय आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. या सिनेमात त्यांच्यासोबतच अॅमी जॅक्सन, सुधांशू पांडे, आदिल हुसैन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट हिट ठरेल अशी या सिनेमाच्या टीमला खात्री आहे. या सिनेमाचे दिग्दर्शक एस. शंकर यांचे असून या सिनेमाच्या टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे. 2.0 हा सिनेमा रजनीकांत यांच्या रोबोट या सिनेमाचा सिक्वल असून या सिनेमाने विक्रमी कमाई केली होती. आता २.0 ने रोबोटचा देखील रेकॉर्ड मोडला असून हा चित्रपट हिंदी, तामीळ अशा पंधरा भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे