​‘पद्मावती’च्या सेटवरील मृत कामगाराच्या कुटुंबाला २० लाखांचा मदतनिधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 08:27 PM2017-01-05T20:27:58+5:302017-01-05T21:37:14+5:30

बॉलिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटवर एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती, ...

20 lakhs relief fund for family of deceased worker on 'Padmavati' set | ​‘पद्मावती’च्या सेटवरील मृत कामगाराच्या कुटुंबाला २० लाखांचा मदतनिधी

​‘पद्मावती’च्या सेटवरील मृत कामगाराच्या कुटुंबाला २० लाखांचा मदतनिधी

googlenewsNext
लिवूडचे ख्यातनाम दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘पद्मावती’ चित्रपटाच्या सेटवर एका कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली होती, यावर स्थानिक कामगार संघटनेने त्यांच्यावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला होता. यामुळे संजय लीला भन्साळी अडचणीत आले होते. आता मृत कामागाराच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांची मदत करणार असल्याचे संजय लीला भन्साळी यांनी मान्य केले असल्याचे सांगण्यात येत आहे. 

‘फिल्म स्टुडिओ सेटिंग’ आणि ‘एलिड मजदूर युनियन’ यांनी केलेल्या आरोपानुसार ‘पद्मावती’च्या टीमने सेटवर सुरक्षा साधनसामुग्री न बाळगल्याने कामगाराला जीव गमवावा लागला होता. मृत मुकेश दखिया हा सेटवर पेंटर होता. तो खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत मुकेशच्या कुुटुंबियांना मदत करण्यासाठी प्रोेडक्शन टीमने पुढाकार घेतला असून त्याच्या कुटुंबियांना २० लाख ८० हजार रुपयांची मदत के ली आहे. सेटवरील अन्य कामगारांनी आपल्या एका दिवसाचा पगार असे एकूण २ लाख २० हजार रुपये एकत्र केले आहेत तर उर्वरित रक्कम निर्मात्यांनी दिली आहे. 

प्रोडक्शन टीम व कामगार युनियनच्या सदस्यांनी मुकेशच्या कुटुबांची भेट घेऊन त्याच्या पत्नीच्या हाती हा मदतनिधी सोपविला आहे. सोबतच निर्मात्यांनी मृत मुकेशच्या पत्नीला काम देण्याची हमी दिली आहे. यासोबतच सेटवर काम करणाºया कामगारांची मुले जी ११ ते ९ वर्षांची आहेत त्यांच्यासाठी पाच लाख रुपयांचा मदतनिधी जमा करण्याचे प्रोडक्शन हाऊसने मान्य केले आहे. कामावर असताना दुखापत झाल्यास तत्त्काळ मेडीकल फॅसिलीटी म्हणून २४ तास आॅन कॉल डॉक्टर उपलब्ध करून द्यावा अशी मागणी देखील केली आहे. 

मदतनिधी दिल्यावर निर्माता संजय लीला भन्साळी यांनी मुकेश धकियाचा भाऊ सुनील याला बोलावून मदतनिधी विषयी चर्चा केली. सोबतच त्याच्या मुलांच्या भविष्याची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे वचन दिले. मुकेशच्या भावाने निर्माते व कामगार युनियनचे आभार मानले आहेत. 

 

Web Title: 20 lakhs relief fund for family of deceased worker on 'Padmavati' set

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.