2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 10:27 AM2018-11-28T10:27:41+5:302018-11-28T10:33:21+5:30

सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या गुरुवारी प्रदर्शित होतोय. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या या चित्रपटावर नाराज आहेत.

2.0: Mobile phone operators demand ban on Rajinikanth starrer | 2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!!

2.0 Movie Controversy: प्रदर्शनाच्या तोंडावर ‘2.0’ वादात! टेलिकॉम कंपन्यांनी केली प्रदर्शन रोखण्याची मागणी!!

googlenewsNext
ठळक मुद्देहोय, आत्तापर्यंत रिलीज झालेला या चित्रपटाचा टीजर, ट्रेलर व अन्य व्हिडिओ पाहून सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने या ‘2.0’च्या मेकर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे.‘2.0’मध्ये ज्याप्रकारे मोबाईल सर्व्हिस व टॉवर्सला दाखवण्यात आले आहे, ते संपूर्णत: निराधार,चुकीचे व काल्पनिक आहे. हे सगळे टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे, असा ठपका असोसिएशनने आपल्या तक्रारीत ठेवला आहे.

सुपरस्टार रजनीकांतअक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या गुरुवारी प्रदर्शित होतोय. एकीकडे प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. पण दुसरीकडे टेलिकॉम कंपन्या या चित्रपटावर नाराज आहेत. होय, आत्तापर्यंत रिलीज झालेला या चित्रपटाचा टीजर, ट्रेलर व अन्य व्हिडिओ पाहून सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने या ‘2.0’च्या मेकर्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. गत २३ नोव्हेंबरला सेन्सॉर बोर्ड आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवण्यात आलेल्या तक्रारीत ‘2.0’च्या ट्रेलर व टीजरचे पुनर्परीक्षण  करण्याची मागणी करण्यात आली आहे. या चित्रपटात मोबाईल आणि टेलिकॉमशी संबंधित वस्तूंना नकारात्मकरित्या दाखवण्यात आल्याचा असोसिएशनचा आक्षेप आहे.


‘2.0’मध्ये ज्याप्रकारे मोबाईल सर्व्हिस व टॉवर्सला दाखवण्यात आले आहे, ते संपूर्णत: निराधार,चुकीचे व काल्पनिक आहे. हे सगळे टेलिकॉम कंपन्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारे आहे, असा ठपका असोसिएशनने आपल्या तक्रारीत ठेवला आहे. सेन्सॉर बोर्ड व माहिती व प्रसारण मंत्रालयाने नव्याने पडताळणी करेपर्यंत या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली जावी,अशी मागणीही असोसिएशनने केली आहे.
सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया एक अशासकीय संस्था आहे. एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स जिओ यासारख्या टेलिकॉम कंपन्या या असोसिएशनच्या सदस्य आहेत.
‘2.0’ येत्या उद्या म्हणजे २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी ५०० कोटींवर पैसा खर्च करण्यात आला आहे. अर्थात यापैकी अर्धा पैसा या चित्रपटाने रिलीजआधी कमावला आहे. हक्क विकून आणि अ‍ॅडव्हान्स बुकींगच्या माध्यमातून अर्धी लागत चित्रपटाने वसूल केली आहे.

Web Title: 2.0: Mobile phone operators demand ban on Rajinikanth starrer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.