​ २०० कोटी कमावले तरीही फ्लॉप म्हणूनच गणल्या जाईल ‘टायगर जिंदा है’! वाचा कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2017 07:19 AM2017-11-08T07:19:14+5:302017-11-08T12:49:14+5:30

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आपण बघितला. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच्या उण्यापु-या तासाभरात पाच लांखांवर लोकांनी ...

200 crore will be earned as a flop, but Tiger is alive! Read the reason !! | ​ २०० कोटी कमावले तरीही फ्लॉप म्हणूनच गणल्या जाईल ‘टायगर जिंदा है’! वाचा कारण!!

​ २०० कोटी कमावले तरीही फ्लॉप म्हणूनच गणल्या जाईल ‘टायगर जिंदा है’! वाचा कारण!!

googlenewsNext
मान खानचा आगामी चित्रपट ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आपण बघितला. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच्या उण्यापु-या तासाभरात पाच लांखांवर लोकांनी तो बघितला. सलमानच्या या चित्रपटाबद्दल लोक किती उत्सूक आहेत, हेच यावरून दिसते.  ट्रेलरला मिळत असलेला हा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहून या चित्रपटाबद्दल अनेक ठोकताळे बांधले जात आहे. चित्रपट सुपरडुपर हिट ठरणार, बॉक्सआॅफिसवर २०० कोटी कमावणार, असे काय काय अंदाज लावले जात आहेत. अर्थात तुम्हाला ठाऊक नसेल, पण ‘टायगर जिंदा है’ बॉक्सआॅफिसवर २०० कोटी कमावले तरीही हा चित्रपट फ्लॉपच म्हणूनच गणल्या जाणार आहे. आश्चर्य वाटले ना? अलीकडे आलेला ‘गोलमान अगेन’ २०० कोटी कमावून सुपरहिट ठरतो मग ‘टायगर जिंदा है’ने २०० कोटी कमावूनही फ्लॉप कसा ठरेल? असा प्रश्न तुम्हाला यानंतर पडू शकतो. पण हे खरे आहे.
२०० कोटी कमावूनही हा चित्रपट ‘फ्लॉप’चं म्हणवला जाईल. कारण या चित्रपटाचा बजेट. होय, सूत्रांचे खरे मानाल तर ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट यशराज बॅनरचा आत्तापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट आहे १४० कोटी. यात पब्लिसिटी, प्रचार आणि सलमान खानची फी जोडली तर हा बजेट कदाचित २०० कोटींच्या घरात पोहोचेल. त्यामुळे चित्रपट हिट करायचा तर याला बॉक्सआॅफिसवर किमान २५० कोटी कमवावे लागतील. यशराज बॅनरने या चित्रपटासाठी पैसा खर्च करताना कुठलीही कसर सोडलेली नाही. चित्रपटातील अ‍ॅक्शन दृश्यांपासून सगळ्यांवर अगदी सढळ हस्ते खर्च करण्यात आला आहे. त्यामुळेच हा खर्च वसूल व्हायचा तर चित्रपटाला २५० कोटींचा टप्पा ओलांडावे लागेल. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष आता बॉक्सआॅफिसवर असणार आहे.

ALSO READ: जबरदस्त अ‍ॅक्शन; दमदार डायलॉग ! ‘टायगर जिंदा है’चा ट्रेलर आला!!

 ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट ‘एक था टायगर’चा सीक्वल आहे. सलमान व कॅटरिना कैफचा ‘एक था टायगर’ हा चित्रपट कबीर खानने  दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट तुफान गाजला होता.  पण हा चित्रपट कबीरऐवजी अली अब्बास जफर दिग्दर्शित करतो आहे.

Web Title: 200 crore will be earned as a flop, but Tiger is alive! Read the reason !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.