2016 : पहा बॉलिवूड स्टार्सचे स्कोरकार्ड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2016 08:28 PM2016-12-29T20:28:05+5:302016-12-30T15:25:09+5:30
‘धोक्याचं वरिस’ समजले जाणारे २०१६ हे वर्ष बॉलिवूडसाठी ‘कभी खुशी गभी गम’ असे ठरले आहे. कारण या वर्षात काही ...
‘धोक्याचं वरिस’ समजले जाणारे २०१६ हे वर्ष बॉलिवूडसाठी ‘कभी खुशी गभी गम’ असे ठरले आहे. कारण या वर्षात काही स्टार्सना यशाच्या शिखरावर पोहचता आले, तर काहींना अपयशाची चव चाखावी लागली. जर या सेलिब्रेटींच्या स्कोरकार्डवर लक्ष वेधल्यास धक्कादायक निर्णय बघावयास मिळतील. विशेष म्हणजे खान त्रिकुटांच्या डिक्शनरीमधून ‘अपयश’ हा शब्द केव्हाच गहाळ झाल्याचे म्हटले जात असले तरी किंग खानला अपयशाचा सामना करावा लागला, तर दोन स्टार्सनी आपल्याच चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून काढत नवा कीर्तिमान स्थापन केला. या सेलिब्रेटींच्या २०१६ मधील स्कोरकार्डवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...
सलमान खान
सद्यस्थितीत निर्विवादपणे दबंग स्टार अर्थात सलमान खान बॉलिवूडचा नंबर वन स्टार आहे. कारण त्याचा चित्रपट येणार आणि कोट्यवधी रुपयांची लयलूट करून जाणार हेच सत्य आहे. चित्रपटाच्या शुटिंगपासून फॅन्स त्याच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असतात. यावर्षी त्याच्या ‘सुल्तान’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर कमाईचे अनेक रेकॉर्ड तोडत इंडस्ट्रीमध्ये आपणच टॉपवर असल्याचे दाखवून दिले. २०१६ मध्ये एकमेव चित्रपट केलेल्या सलमानच्या ‘सुल्तान’ने ३००.४५ कोटी रुपयांची लयलूट केली. अर्थात नेहमीप्रमाणे या चित्रपटामुळेदेखील तो विवादात सापडला होता. प्रमोशनप्रसंगी त्याने केलेले वादग्रस्त वक्तव्य त्याच्या चांगलेच अंगलट आले होते.
ब्लॉकबस्टर - 0१
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 00
दीपिका पादुकोण
बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पादुकोणचा यावर्षी केवळ एकच चित्रपट आला. ‘पिंक’मध्ये ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली. हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. तसेच अनेक पुरस्कारही चित्रपटाने नावावर करून घेतले. या वर्षात दीपिका तिचा पहिला हॉलिवूडपट ‘ट्रिपल एक्स- द रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटामुळेच अधिक चर्चेत राहिली. जानेवारी २०१७ मध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 0१
सरासरी - 00
फ्लॉप - 0
आमिर खान
मिस्टर परफेक्टनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाºया आमिर खानचा वर्षातून एकच चित्रपट रिलीज होत असतो अन् तोही शक्यतो वर्षाअखेरीसच रिलीज केला जातो. २०१६ मध्ये ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर रिलीज करण्यात आलेला त्याचा ‘दंगल’ या चित्रपट बॉक्स आॅफिसवर धूम उडवित आहे. हा चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये केव्हा पोहचणार याचीच प्रतीक्षा आहे.
ब्लॉकबस्टर - 0१
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 00
प्रियंका चोपडा
बॉलिवूडमध्ये २०१६ हे वर्ष प्रियंकासाठी फारसे चांगले ठरले नसले तरी हॉलिवूडमध्ये ती यावर्षात यशाचा एक-एक टप्पा सर करताना बघावयास मिळाली. या वर्षात तिचा फक्त एकच चित्रपट रिलीज झाला. ‘जय गंगाजल’मधून ती प्रेक्षकांसमोर आली. मात्र प्रेक्षकांनी तिला नाकारले. हॉलिवूडमध्ये ‘बेवॉच’ आणि अमेरिकन सिरियल ‘क्वांटिको’मुळे ती चर्चेत राहिली.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 0१
शाहरूख खान
शाहरूखसाठी २०१६ हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. कारण त्याच्या ‘फॅन’ या चित्रपटाने अपेक्षेप्रमाणे कमाई केली नसल्याने त्याला चांगलाच झटका बसला. ‘फॅन’च्या फ्लॉपमुळे त्याचा आत्मविश्वास एवढा खालावला की, त्याने सलमानच्या ‘सुल्तान’बरोबर ‘रईस’चा सामना करण्यास सपशेल नकार देत ‘रईस’ची तारीख पुढे ढकलली. त्यामुळे त्याच्या स्टारडमलादेखील धक्का बसला. या वर्षात रिलीज झालेल्या त्याच्या दुसºया ‘डियर जिंदगी’ या चित्रपटात त्याने काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या नावाला साजेशी कमाई हा चित्रपट करू शकला नाही. करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात तो एका सीनमध्ये झळकला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 0१
सरासरी - 00
फ्लॉप - 0१
कॅटरिना कैफ
२०१६ हे वर्ष कॅटरिनासाठी खूपच दु:खदायक ठरले. बॉयफ्रेंड रणबीर कपूरबरोबरचे संबंध संपुष्टात आलेच शिवाय यावर्षातले तिचे दोन्ही चित्रपट सपशेल फ्लॉप ठरले. वर्षाच्या सुरुवातीलाच रिलीज झालेला ‘फितूर’ हा चित्रपट फारसा करिष्मा दाखवू शकला नाही. त्याचबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा याच्यासोबतचा ‘बार बार देखो’ हा चित्रपटही प्रेक्षकांनी नाकारला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 0२
अक्षयकुमार
बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमार याच्याकरिता २०१६ हे वर्ष यशस्वी राहिले आहे. यावर्षी त्याचे तीन चित्रपट रिलीज झाले अन् तिन्ही चित्रपट हिट ठरल्याने त्याला तीनशे कोटी रुपयांच्या क्लबमध्ये स्थान मिळाले. मात्र त्याचा बॉलिवूडमधील प्रवास पाहता ही कमाई त्याच्या प्रतिष्ठेला शोभत नाही. कारण त्याचा हिट चित्रपट सवाशे कोटी रुपयांच्या पुढे जात नाही. कारण त्याचे ‘रुस्तम’ आणि ‘एअरलिफ्ट’ सुपरहिट ठरले, तर ‘हाउसफुल’ने सरासरी कमाई केली.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 0२
हिट - 00
सरासरी -0१
फ्लॉप - 00
अनुष्का शर्मा
तिन्ही खानसोबत काम करण्याची संधी मिळालेल्या अनुष्का शर्मा हिच्यासाठी २०१६ हे वर्ष खूपच लकी ठरले. सलमानसोबतच्या ‘सुल्तान या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर धूम उडवून दिली, तर ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने सरासरी यश मिळवले.
ब्लॉकबस्टर - 0१
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0१
फ्लॉप - 00
हृतिक रोशन
हृतिक २०१६ या वर्षाला कदाचित कधीच स्मरणात ठेवणार नाही. कारण कंगना राणौतबरोबरच्या वादामुळे त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातच यावर्षी रिलीज झालेल्या ‘मोहेंजोदडो’ या चित्रपटाच्या फ्लॉपमुळे त्याला जबरदस्त धक्का सोसावा लागला. या चित्रपटासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली होती. मात्र बॉक्स आॅफिसवर चित्रपट असा काही आपटला की, हृतिक आणि चित्रपटाचा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. आता हृतिकला नव्या वर्षात काही तरी करिष्मा करावा लागेल. कारण रणवीर आणि वरुण धवनसारखे स्टार त्याच्या रांगेत येण्यासाठी काही पावलेच मागे आहेत.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 0१
ऐश्वर्या राय बच्चन
बºयाच वर्षांनंतर ऐश्वर्याने २०१६ या वर्षात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या वर्षातील तिचा पहिला चित्रपट ‘सरबजीत’ फार काही करिष्मा करू शकला नाही. मात्र चित्रपटाने सरासरी यश मिळवले. तसेच ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपटानेदेखील सरासरी यश मिळाले.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0२
फ्लॉप - 00
अजय देवगण
गेल्या चार-पाच वर्षांपासून अजय देवगण हिट चित्रपटाच्या शोधात आहे. ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिर्टन्स’ या दोन चित्रपटांव्यतिरिक्त त्याला एकही सुपरहिट चित्रपट देता आला नाही. यावर्षी त्याचा ‘शिवाय’ हा चित्रपट रिलीज झाला. मात्र बॉक्स आॅफिसवर हिटचा दर्जा मिळवण्यासाठी त्याला चांगलीच धडपड करावी लागली. दिवाळीत रिलीज झालेल्या या चित्रपटाला करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाशी सामना करावा लागला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. रिलीजपूर्वीच करण आणि त्याच्यात कोल्डवॉर रंगले होते. ‘फितूर’मध्ये तो एक छोटीशी भूमिका साकारताना बघावयास मिळाला.
ब्लॉकबस्टर 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 01
फ्लॉप - 00
सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षीसाठी २०१६ हे वर्ष फारसे चांगले गेले नाही. यावर्षात तिचे दोन चित्रपट रिलीज झाले. त्यातील ‘अकिरा’ हा चित्रपट सपशेल फ्लॉप ठरला, तर ‘फोर्स-२’ मध्येही तिला अपयशाचाच सामना करावा लागला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 0२
अमिताभ बच्चन
सत्तर प्लस एवढे वय असतानाही महानायक अमिताभ बच्चन नेहमीच बॉलिवूडच्या रेसमध्ये असतात. केवळ अभिनयाच्या जोरावर ते प्रेक्षकांच्या मनात घर करून असल्याने आजही त्यांचे चित्रपट कोटीच्या क्लबमध्ये स्थान मिळवत आहेत. मात्र २०१६ हे वर्ष त्यांच्यासाठी ‘कभी खुशी कभी गम’ असेच राहिले आहे. कारण ‘वजीर’ आणि ‘तीन’ या चित्रपटातून त्यांना फ्लॉपचा सामना करावा लागला, तर ‘पिंक’ बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. पिंकमधील त्यांच्या अभिनयाचे भरपूर कौतुक केले गेले. त्यामुळे त्यांना बरचसे पुरस्कारही मिळाले.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 0१
सरासरी - 00
फ्लॉप : 0२
नर्गिस फाखरी
नर्गिस फाखरी हिच्यासाठी २०१६ हे वर्ष फारसे लाभदायक ठरले नसले तरी तिच्या करिअर दिशा देणारे ठरले आहे. यावर्षात तिचे दोन चित्रपट रिलीज झाले. त्यात ‘हाउसफुल-३’ या चित्रपटाने सरासरी कमाई केली, तर ‘अजहर’ हा चित्रपट फ्लॉप ठरला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0१
फ्लॉप - 0१
रणबीर कपूर
गेल्या वर्षीप्रमाणे २०१६ मध्येदेखील रणबीर कपूरला यशस्वीतेपासून दूर रहावे लागले. त्याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटातून त्याला भरपूर अपेक्षा होत्या. मात्र सरासरीपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाला करता आली नाही. हे वर्ष त्याच्या चित्रपटांपेक्षा कॅटरिनासोबतच्या रिलेशनशिपवरूनच अधिक चर्चेत राहिले. त्याने ‘प्रेम, रोमांसऐवजी अभिनयावर लक्ष केंद्रित करावे’ असा सल्लाही त्याला कित्येकांनी दिला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 01
फ्लॉप - 0
आलिया भट्ट
२०१६ मध्ये आलियाचे ‘कपूर अॅण्ड सन्स’, ‘उडता पंजाब’ आणि ‘डियर जिंदगी’ असे तीन चित्रपट रिलीज झाले. त्यातील दोन फ्लॉप ठरले, तर एका चित्रपटाला यश मिळाले. मात्र तिन्ही चित्रपटांत आलियाची भूमिका विशेष कौतुकास्पद ठरली.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 0२
सरासरी - 0१
फ्लॉप - 0१
रणवीर सिंह
यंदा रणवीर सिंह याचा एकमात्र ‘बेफिक्रे’ हा चित्रपट रिलीज झाला. वर्षाअखेरीस रिलीज झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत सरासरी कमाई केली असून, चित्रपटातील इंटिमेट सीन्स चांगलेच गाजत आहेत. या चित्रपटाव्यतिरिक्त संपूर्ण वर्ष दीपिकासोबतच्या रिलेशनशिपवरूनच तो चर्चेत राहिला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 01
फ्लॉप : 00
सोनम कपूर
२०१६ या वर्षात सोनमने एकाच बायोपिक चित्रपटात काम केले. ‘नीरजा’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. त्याचबरोबर तिच्या करिअरलादेखील कलाटणी मिळाली.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 0१
सरासरी - 00
फ्लॉप - 00
वरुण धवन
बॉलिवूडमधील सर्वांत झटपट यश मिळवणारा व तेवढ्याच वेगाने प्रगतीकडे वाटचाल करणारा अभिनेता म्हणून वरुण धवनला ओळखले जाते. २०१६ मध्ये त्याचा एकमेव ‘ढिशूम’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर सरासरी कमाई केली. मात्र त्याच्या लोकप्रियतेत घट झाली नाही.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0१
फ्लॉप - 00
श्रद्धा कपूर
श्रद्धा कपूरने यावर्षात दोन चित्रपट केले. ‘बागी’ आणि ‘रॉक आॅन-२’मधून ती प्रेक्षकांसमोर आली. बागीला चांगले यश मिळाले, तर ‘रॉक आॅन-२’ फारसा करिष्मा दाखवू शकले नाही.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 0१
सरासरी - 00
फ्लॉप - 0१
जॉन अब्राहम
जॉन अब्राहम याला २०१६ या वर्षात खºया अर्थाने अॅक्शन हिरो म्हणून ओळख मिळाली आहे. ‘ढिशूम’ या चित्रपटातून आदळआपट करून त्याने प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचण्यास भाग पाडले. मात्र त्यानंतर आलेल्या ‘रॉकी हॅण्डसम आणि फोर्स-२’ हे चित्रपट प्रेक्षकांना फारसे भावले नाहीत.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0१
फ्लॉप - 0२
जॅकलीन फर्नांडीस
जॅकलीनचे यावर्षात तीन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘हाउसफुल-३, ए फ्लाइंग जट आणि ढिशूम’ या चित्रपटात ती झळकली. त्यातील दोन चित्रपटांनी सरासरी यश मिळवल्याने तिच्यासाठी २०१६ हे वर्ष चांगले गेले असेच म्हणावे लागेल.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0२
फ्लॉप - 0१
सिद्धार्थ मल्होत्रा
सिद्धार्थ मल्होत्रा याच्या ‘एक विलेन’ या चित्रपटाला मिळालेल्या यशाची पुनर्रावृत्ती तो २०१६ मध्ये करू शकला नाही. सध्या तो करण जोहर याच्या छत्रछायेखाली वावरत आहे. करणने त्याच्या डोक्यावरील हात काढून घेतल्यास सिद्धार्थचे काय होईल देव जाणे! या वर्षी त्याचे दोन चित्रपट रिलीज झाले. ‘कपूर अॅण्ड सण्स’ या चित्रपटाने सरासरी, तर ‘बार बार देखो’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर सपशेल अपयशी ठरला आहे.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0१
फ्लॉप - 0१
विद्या बालन
२०१६ हे वर्ष विद्यासाठी फारसे चांगले गेले नाही. यावर्षात तिचे तीन चित्रपट रिलीज झाले, मात्र तिन्ही चित्रपट प्रेक्षकांनी नाकारले. ‘एक अलबेला’, ‘तीन’ आणि ‘कहाणी’ या चित्रपटांमध्ये ती झळकली. मात्र तिला अपयशाचा सामना करावा लागला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
अर्जून कपूर
२०१६ हे वर्ष अर्जून कपूरसाठी फारच अडखळीचे ठरले आहे. कारण यावर्षात त्याला फारसा करिष्मा दाखविता आला नाही. करिना कपूर हिच्यासोबत त्याने ‘की अॅण्ड का’ या चित्रपटात काही तरी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रेक्षकांना त्याचा हा प्रयत्न फारसा भावला नाही. मात्र सरासरी यश मिळवण्यात या चित्रपटाला यश आले होते.
ब्लॉकबस्टर- 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0१
फ्लॉप - 00
शाहिद कपूर
शाहिद कपूर याच्याकरिता वैवाहिक जीवनातील सुखद घटना सोडल्यास करिअरच्या ग्राफमध्ये यशाचे मोहर लावणे शक्य झाले नाही. कारण त्याने हिट चित्रपट केव्हा दिला हे कदाचित त्यालाही माहिती नसेल. यावर्षात त्याचा ‘उडता पंजाब’ हा चित्रपट रिलीज झाला. वादाच्या भोवºयात सापडूनदेखील या चित्रपटाला फारसे यश मिळवता आले नाही.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 0१
फ्लॉप - 00
इमरान हाशमी
फ्लॉप चित्रपट आणि इमरान हाशमी हे जणू काही सूत्रच बनले आहे. कारण त्याच्या फ्लॉपच्या ग्राफमध्ये २०१६ मध्ये आणखी दोन चित्रपटांची भर पडली. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार अजहरुद्दीन याच्या जीवनावर आधारित ‘अजहर’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर फारशी कमाल करू शकला नाही. त्याचबरोबर भट्ट कॅम्पच्या ‘राज रिबूट’ या चित्रपटालाही फ्लॉपचा सामना करावा लागला. आता इमरान निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावत आहे.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरहिट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 0२
फरहान अख्तर
पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यापासून फरहान अख्तर बॉक्स आॅफिसवर हिट चित्रपटासाठी झगडत आहे. २०१६ मध्ये त्याचे दोन चित्रपट रिलीज झाले. मात्र हे दोन्ही चित्रपट बॉक्स आॅफिसवर फ्लॉप ठरले. ‘वजीर आणि रॉक आॅन-२’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी सपशेल नाकारले. श्रद्धा कपूर आणि आदिती राव हैदरी यांच्यासोबतचा त्याचा रोमांस अधिक चर्चेत राहिला.
ब्लॉकबस्टर - 00
सुपरिहट - 00
हिट - 00
सरासरी - 00
फ्लॉप - 0२
टायगर श्रॉफ
‘हिरोपंती’ या चित्रपटातून यशस्वी डेब्यू करणाºया टायगर श्रॉफचे बॉलिवूड करिअर उज्ज्वल समजले जात आहे. २०१६ मध्ये आलेल्या त्याच्या ‘बागी’ या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. ‘ए फ्लाइंग जट्ट’ फ्लॉप ठरला असला तरी, टायगरकडून बॉलिवूडला बºयाच अपेक्षा आहेत.
ब्लॉकबस्टर - 0
सुपरिहट - 0