Avneet Kaur : "मी आणि माझा..."; २३ वर्षांच्या अवनीत कौरने सांगितली आपली मजेशीर 'लव्ह स्टोरी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:16 IST2025-01-25T12:15:35+5:302025-01-25T12:16:59+5:30
Avneet Kaur : अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अवनीत कौरने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे.

Avneet Kaur : "मी आणि माझा..."; २३ वर्षांच्या अवनीत कौरने सांगितली आपली मजेशीर 'लव्ह स्टोरी'
२३ वर्षीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर अवनीत कौरने तिच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करताना तिने मजेदार पद्धतीने एक 'लव्ह स्टोरी' सांगितली. अवनीत कौर सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे आणि तिच्या सुंदर फोटो चाहत्यांसोबत शेअर करत राहते. आता तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बेडवर झोपलेला एक छोटासा व्हिडीओ शेअर केला आहे. त्या छोट्या व्हिडिओमध्ये ती ब्राऊन रंगाचा स्वेटशर्ट घालून सेल्फी काढताना दिसत आहे.
अवनीतने कॅप्शनमध्ये लिहिलं, "मी आणि माझा बेड, ही एक लव्ह स्टोरी आहे." दुसऱ्या स्टोरीत अभिनेत्रीने सांगितलं की, ती सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे. तिने १३ अंश तापमानात शूट केलं. मात्र तिने प्रोजेक्टची माहिती दिली नाही. ती तिथे चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेली होती की मालिकेच्या, हे तिने सांगितलेलं नाही.
गेल्या आठवड्यातच, अवनीतने अबू धाबीमधील कोल्डप्ले कॉन्सर्टला हजेरी लावली, ज्याला तिने सर्वोत्तम म्हटलं आणि ती म्हणाली की, तिला परत जाऊन ते सुंदर क्षण लोकांसोबत शेअर करायचे आहेत. त्यानंतर अवनीतने इन्स्टाग्राम स्टोरीवर कॉन्सर्टचे अनेक व्हिडीओ शेअर केले.
अवनीतने २०१० मध्ये 'डान्स इंडिया डान्स' या डान्स शो 'लिटिल मास्टर्स' मधून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली. अवनीतने २०१२ मध्ये 'मेरी माँ' या चित्रपटातून तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. यानंतर ती 'तेडे हैं पर तेरे मेरे हैं' आणि 'झलक दिखला जा' मध्ये दिसली. २०१३ मध्ये त्यांनी 'सावित्री - एक प्रेम कहानी' आणि 'एक मुठी आसमान' मध्ये काम केलं.