​२५ नाही २४ जानेवारीलाच प्रदर्शित होणार ‘पद्मावत’! वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 06:49 AM2018-01-22T06:49:29+5:302018-01-22T12:20:43+5:30

रणवीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावत’ हा वादग्रस्त चित्रपट या आठवड्यात येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार ...

25 'Padmavat' will be displayed on January 24! Supreme Court again in court | ​२५ नाही २४ जानेवारीलाच प्रदर्शित होणार ‘पद्मावत’! वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात!!

​२५ नाही २४ जानेवारीलाच प्रदर्शित होणार ‘पद्मावत’! वाद पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात!!

googlenewsNext
वीर सिंग, दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूर स्टारर ‘पद्मावत’ हा वादग्रस्त चित्रपट या आठवड्यात येत्या २५ जानेवारीला रिलीज होणार आहे. पण यात एक ट्विस्ट आहे. होय, आता हा चित्रपट अधिकृतरित्या २४ तारखेला रिलीज होणार आहे. पण अर्थातच यासाठी काही अटी लागू आहेत. होय, प्रत्येकजण २४ तारखेला हा चित्रपट बघू शकणार नाही. २४ जानेवारीला  केवळ ३ डी आणि आयमॅक्स ३ डीमध्येच चित्रपट रिलीज होणार आहे. २४ जानेवारीला ‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी देशभरातील ३ डी आणि आयमॅक्स ३डीमध्ये पेड प्रीव्यू ठेवले आहेत.  या चित्रपटगृहांत २४ जानेवारीच्या रात्री ९.३० वाजता जो कुठला शो होणार असेल, त्याची आर्थिक भरपाई करून त्याजागी ‘पद्मावत’चा शो दाखवला जाणार आहे. उर्वरित चित्रपटगृहांत मात्र २५ तारखेलाच हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्यामुळे काही मोजके लोक ३ डीच्या मोठ्या कॅनव्हासवर हा चित्रपट बघू शकतील. ‘पद्मावत’बद्दलचा अफवा कमी करणे शिवाय माऊथ पब्लिसिटी करण्यासाठी निर्मात्यांनी ही योजना आखल्याचे बोलले जात आहे.

ALSO READ : ‘घूमर’ गाण्यात दीपिका पादुकोणची झाकलेली कंबर पाहून नेटक-यांना आले हसू !!

मध्यप्रदेश, राजस्थान सरकारच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी

‘पद्मावत’वर बंदी लादण्याची मागणी करणा-या मध्यप्रदेश व राजस्थान सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या मंगळवारी सुनावणी करणार आहे. मध्यप्रदेश सरकारने आज ‘पद्मावत’ला विरोध करत, सर्वोच्च न्यायालयात अंतरिम याचिका दाखल केली. न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयावर फेरविचार करावा, अशी विनंती या याचिकेत करण्यात ा आली आहे. गत १८ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने ‘पद्मावत’वर मध्यप्रदेश, राजस्थानसह गुजरात व हरियाणा अशा चार राज्यांनी लादलेली बंदी घटनाबाह्य ठरवली होती. कुठलेही राज्य ‘पद्मावत’च्या प्रदर्शनावर बंदी लादू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Web Title: 25 'Padmavat' will be displayed on January 24! Supreme Court again in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.