2599 दिवस! अन् ट्विटर सोडू शकतात अमिताभ बच्चन!!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 04:49 AM2018-02-01T04:49:57+5:302018-02-01T10:26:37+5:30
इकडे ट्विटर फॉलोअर्सच्या वॉरमध्ये किंगखान शाहरूख खान नंबर वन ठरला अन् तिकडे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून ‘एक्झिट’ घेण्याचे ...
इ डे ट्विटर फॉलोअर्सच्या वॉरमध्ये किंगखान शाहरूख खान नंबर वन ठरला अन् तिकडे महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून ‘एक्झिट’ घेण्याचे संकेत दिलेत. होय, अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी ही बातमी धक्कादायक असली तरी खरी आहे. सर्वाधिक फॉलोअर्सच्या शर्यतीत शाहरूखने अमिताभ यांना मागे टाकल्याची बातमी कालचं व्हायरल झाली आणि अचानक अमिताभ यांनी ही अनपेक्षित प्रतिक्रिया आली. ट्विटरने अमिताभ यांचे फॉलोअर्स घटवले आणि यामुळे अमिताभ संतापले,असे कळतेय. याच नाराजीतून अमिताभ यांनी ट्विटर सोडण्याची धमकीही देऊन टाकली.
बुधवारी रात्री अमिताभ यांनी ट्विट करून आपली नाराजी बोलून दाखवली. रात्री ११.३५ वाजता त्यांनी ट्विट केले आणि सगळ्यांनाच धक्का बसला. ‘ट्विटर, आपण माझ्या फॉलोअर्सचा आकडा कमी केलात? ही गंमत आहे का? निरोप घेण्याची वेळ आता आलीयं. आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी आभार,’ असे त्यांनी लिहिले. दुस-या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा उल्लेख करत त्यांनी पुढे लिहिले की, ‘या समुद्रात आणखीही अनेक मासे आहेत आणि जे अधिक रोचक आहेत.’ यावेळी अमिताभ यांनी ट्विटरवर त्यांचे फॉलोअर्स घटवण्याचा आरोपही केला. आता अमिताभ यांच्या मनात नेमके काय आहे, ते माहित नाही. हे ट्विट त्यांनी गमतीत केलेले आहे की, ट्विटर सोडण्याबद्दल ते खरोखरीच गंभीर आहेत, हे लवकरच स्पष्ट होईल.
अमिताभ बच्चन आपल्या प्रत्येक ट्विटच्या प्रारंभी त्यांनी ट्विटरवर घालवलेले दिवस लिहितात. काल रात्री केलेल्या ट्विटची सुरूवात त्यांनी T2599 ने केली आहे. याचा अर्थ अमिताभ यांनी आत्तापर्यंत एकूण 2599 ट्विट केले आहेत.
ALSO READ : यूजरने विचारले, तुमच्यासाठी पैसाच सर्वकाही आहे काय?, महानायकांनी दिले ‘हे’ उत्तर!
ट्विटर फॉलोअर्सची संख्या तासागणिक कमी-अधिक होत असते. तूर्तास शाहरूखचे 3,29,33,940 फॉलोअर्स आहेत. तर अमिताभ यांचे 3,28,97,991 फॉलोअर्स आहेत. शाहरूख आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक गोष्टी ट्विटरवर शेअर करतो. याऊलट अमिताभ आपल्या बहुतांश ट्विटमध्ये स्वत:चे फोटो शेअर करतात. अन्य सेलिब्रिटींना बर्थ डे विश करतानाही ते सोबत आपला फोटो शेअर करतात. सोशल मीडियावरचा बिग बी यांचा हा अंदाज त्यांच्या चाहत्यांना प्रचंड भावतो.