IFFLA मध्ये 27 भारतीय चित्रपटांची पर्वणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2016 12:52 PM2016-02-27T12:52:04+5:302016-02-27T05:54:38+5:30
भारतीय चित्रपटांना विदेशी प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल आॅफ लॉस एंजलस’ (IFFLA) मध्ये यावेळी ...
भ रतीय चित्रपटांना विदेशी प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवून सुरू करण्यात आलेल्या ‘इंडियन फिल्म फेस्टिव्हल आॅफ लॉस एंजलस’ (IFFLA) मध्ये यावेळी 27 भारतीय चित्रपट दाखविले जाणार आहेत.
६ एप्रिल रोजी सुरू होणाऱ्या या पाच दिवसीय चित्रपट महोत्सवाचे यंदा 14 वे वर्ष आहे. 16 चित्रपट आणि 11 लघुपट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
पॅन नलिन दिग्दर्शित ‘अँग्री इंडियन गॉडेसेस’ चित्रपट महोत्सवाचे प्रमुख आकर्षण आहे. ही सात भारतीय मुलींची कथा आहे. त्यांना समाजात कशाप्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते यावर हा चित्रपट आधारित आहे.
सेराह-जेन डियाज्, संध्या मृदुल, तनिष्ता चॅटर्जी, अनुष्का मंचंदा, अमृत मघेरा, राजश्री देशपांडे आणि पलवीन गुजराल यांनी चित्रपटात काम केलेले आहे.
नसिरुद्दीन शहा आणि कल्की कोचलिन अभिनित ‘वेटिंग’ चित्रपटाने महोत्सवाची सुरूवात होणार आहे. अनु मेनन दिग्दर्शित या चित्रपटात एका महिलेची कथा दाखविण्यात आली आहे जिला पती कोमात गेल्यावर एका सदगृहस्थाकडून मार्गदर्शन आणि आधार मिळतो.