४१ वर्षीय सुष्मिता सेनने दाखविले तिचे अॅब्स, पहा फोटो!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 09:02 AM2017-11-07T09:02:47+5:302017-11-07T22:19:24+5:30
मिस युनिव्हर्सचा ताज मिळविलेल्या सुष्मिता सेनचे सौंदर्य तसूभरही कमी झालेले नाही. वाढत्या वयातही ती खूप सुंदर दिसते. वाचा सविस्तर!
१ ९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज मिळविलेली अभिनेत्री सुष्मिता सेन आज जरी बॉलिवूडपटांमधून गायब असली तरी, तिच्या सौंदर्याचे जलवे सोशल मीडियावर नेहमीच बघावयास मिळतात. ४१ वर्षीय सुष्मिताचे सौंदर्य तसूभरही कमी झाले नसून, उलट तिच्या सौंदर्यात भरच पडत आहे. सुष्मिताने नुकता इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला असून, त्यामध्ये ती तिचे अॅब्स दाखविताना दिसत आहे. फोटोत सुष्मिता अंगावरून टी-शर्ट तोंडात धरून अॅब्स दाखविताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना सुष्मिताने एक लांबलचक मॅसेजही लिहिला आहे. सुष्मिता येत्या १९ नोव्हेंबर रोजी ४२ वर्षांची होणार आहे.
खरं तर सुष्मिता तिच्या फिटनेसविषयी खूपच अलर्ट आहे. वृत्तानुसार गेल्या काही काळापासून ती स्लिप डिस्क यापासून त्रस्त आहे. त्यामुळे ती जीम आणि एक्सरसाइजला अधिक प्राधान्य देते. त्याचबरोबर योगा आणि डान्सच्या माध्यमातून ती स्वत:ला फिटही ठेवते. सुष्मिता प्रत्येक आठवड्यात तिच्या वर्कआउटमध्ये बदल करते. त्यासाठी ती रनिंग, कार्डिया आणि एरियल एक्सरसाइजला प्राधान्य देते. त्याचबरोबर ती एक हेल्दी डायट आणि मेडिटेशनही फॉलो करते. तिच्या मते, स्वस्थ शरीर आणि स्वस्थ विचारांमुळे चेहºयावर एक वेगळीच चमक येते.
सुष्मिताने १९९४ मध्ये मिस युनिव्हर्सचा ताज मिळविलेल्या बॉलिवूडमध्ये १९९६ मध्ये ‘दस्तक’ या चित्रपटातून पाऊल ठेवले. त्यानंतर तिने सिर्फ तूम, बीवी नं. १, आँखे, तुमको ना भूल पाएंगे, मै हूं ना, मैंने प्यार क्यों किया, बेवफा यांसह इतरही चित्रपटांमध्ये काम केले. ती अखेरीस ‘नो प्रॉब्लम’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती.