​‘बादशाहो’च्या स्टारकास्टने केला ५ हजार किमी.चा प्रवास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 11:01 AM2017-08-06T11:01:16+5:302017-08-06T16:31:16+5:30

‘बादशाहो’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की, मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटासाठी  स्टारकास्ट ...

5 thousand km journey by Starstar of Badshaho! | ​‘बादशाहो’च्या स्टारकास्टने केला ५ हजार किमी.चा प्रवास!

​‘बादशाहो’च्या स्टारकास्टने केला ५ हजार किमी.चा प्रवास!

googlenewsNext
ादशाहो’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. पण तुम्हाला कदाचित माहित नसेल की, मिलन लुथरिया दिग्दर्शित या चित्रपटासाठी  स्टारकास्ट आणि क्रू मेंबर्सनी प्रचंड मेहनत केली आहे. चित्रपटाचे संपूर्ण शूटींग रिअल लोकेशनवर झाल्याने यासाठी सर्वांना हजारो किमींचा प्रवास करावा लागला.
या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याशिवाय इमरान हाश्मी, विद्युत जामवाल, इलियाना डिक्रूज, इशा गुप्ता, संजय गुप्ता अशी भली मोठी स्टारकास्ट आहे. जोधपूर, जैसलमेर, बिकानेर, कुलधारा आणि रनौतार अशा रिअल लोकेशन्सवर या मल्टिस्टारर चित्रपटाचे शूटींग झाले आहे. वाळवंटात जिथे नेटवर्क नव्हते,अशा ठिकाणी चित्रपटाचे शूटींग करताना क्रू मेंबर्सला बºयाच अडचणींना तोंड द्यावे लागले. लोकल लाइन प्रोड्यूसर्सच्या मदतीने याठिकाणचे शूटींग केले गेले. रिअल लोकेशन्सवरील शूटींगसाठी स्टारकास्टने सुमारे ५००० किमीचा प्रवास केला. रनौतर या एकाच ठिकाणचे उदाहरण घ्यायचे तर येथे दरदिवशी पोहोचायला १०३ किमीचा प्रवास करावा लागायचा. म्हणजेच जाणे १०३ किमी आणि येणे १०३ किमी. यादरम्यान रिले सिक्युरिटी टीम दर किलोमीटरवर मॅसेज देण्यासाठी वॉकीटॉकीचा वापर करायची. युनिटचे खरे मानाल तर,या मार्गावरची गावेही विचित्र होती. या ठिकाणचे लोक केवळ बकरीचे दूध पिऊन राहायचे. मासं किंवा शाकाहारी असे काहीही हे लोक खात नाहीत. जोधपूरमध्ये शूटींग झाले त्यावेळी येथील अरूंद बोळींनी क्रू मेंबर्ससमोर अडचणी निर्माण केल्या. कारण या बोळींमधून कार जाऊ शकत नव्हत्या. येथील शूटींगसाठी इमरान आणि इशाने अनेकदा आॅटोने पोहोचले.   ३८ डिग्री तापमानात जानेवारी ते मार्च या काळात कडक उन्हात हे शूटींग झाले. येत्या १ सप्टेंबरला हा चित्रपट आपल्या भेटीस येतो आहे.

Web Title: 5 thousand km journey by Starstar of Badshaho!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.