'केदारनाथ' चित्रपटातील ह्या दृश्यासाठी वापरले ५० लाख लीटर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 06:00 AM2018-11-15T06:00:00+5:302018-11-15T06:00:00+5:30

अभिनेता सुशांत सिंग राजपूत व अभिनेत्री सारा अली खान यांचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'केदारनाथ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

50 million liters of water used for this view in the film 'Kedarnath' | 'केदारनाथ' चित्रपटातील ह्या दृश्यासाठी वापरले ५० लाख लीटर पाणी

'केदारनाथ' चित्रपटातील ह्या दृश्यासाठी वापरले ५० लाख लीटर पाणी

googlenewsNext
ठळक मुद्देउत्तराखंडमध्ये २०१३ साली आलेल्या भीषण पूराच्या पार्श्‍वभुमीवर आधारीत 'केदारनाथ' चित्रपट भीषण पूरातील प्रेमकथा 'केदारनाथ' चित्रपटात

अभिनेता सुशांत सिंग राजपूत व अभिनेत्री सारा अली खान यांचा बहुचर्चित आगामी चित्रपट 'केदारनाथ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात २०१३ साली उत्तराखंडमध्ये आलेल्या भीषण पूरातील प्रेमकथा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील पूराच्या दृश्यासाठी तब्बल ५० लाख लीटर पाण्याचा वापर करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते आहे. 

उत्तराखंडमध्ये २०१३ साली आलेल्या भीषण पूराच्या पार्श्‍वभुमीवर आधारीत 'केदारनाथ' चित्रपट असून यातील पूराच्या दृश्‍यासाठी ५० लाख लीटर पाणी वापरावे लागले आहे. एवढे पाणी ४७० वॉटर टॅंकर भरून पाणी आणायला लागले होते. एवढे प्रचंड पाणी एका स्वीमिंग टॅंकसारख्या पाण्याच्या टाकीमध्ये भरून ठेवले गेले होते. ही प्रचंड टाकी खोपोलीमध्ये तयार केली गेली आहे. याच टॅंकमध्येच केदारनाथचा एक सेटही तयार केला गेला आहे.
सारा अली खान या पूरामुळे अडकलेली पर्यटक तर सुशांत हा पर्यटकांना पाठीवरून घेऊन जाणारा एक पिट्टू म्हणजे हमाल दाखवला आहे. अशाप्रकारे पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग यापूर्वीही काही सिनेमांमध्ये केला गेला आहे. करण जोहरचा माय नेम इज खान आणि महेश भट्ट यांचा तुम मिलेमध्येही पूराचे सीन1  शूट करण्यासाठी २०० टॅंकर भरून पाणी वापरले गेले होते. याशिवाय २००९ मध्ये प्रियदर्शनच्या दे दना दनमध्ये त्सुनामीच्या सीनसाठी तब्बल ७०३४५६७८९० टॅंकर पाणी वापरले गेले होते. या क्‍लायमॅक्‍सच्या सीनसाठी ८० लाख लीटर पाणी वापरले गेले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते आहे. 

'केदारनाथ' हा सारा अली खानचा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. केवळ लूकच नाही तर 'केदारनाथ'च्या ट्रेलरमधील साराचा अभिनयही शानदार आहे. 'केदारनाथ' या पहिल्याच चित्रपटात साराने एक किसींग सीनही दिला आहे.या चित्रपटात सारा अली खान अभिनेता सुशांत सिंगसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. 'केदारनाथ'च्या ट्रेलरमधील अनेक दृश्ये चित्तथरारक आहेत. काही दृश्ये तर थेट टायटॅनिक ट्रॅजिडीची आठवण करून देतात. सारा अली खान व सुशांत सिंग राजपूतची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर कशी वाटते, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
 

Web Title: 50 million liters of water used for this view in the film 'Kedarnath'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.