५२ वर्षीय पती आणि २७ वर्षीय पत्नीचा अंडरवॉटर रोमान्स, एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले मिलिंद सोमण आणि अंकिता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2018 06:37 AM2018-05-01T06:37:08+5:302018-05-01T12:07:08+5:30
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर लग्नबंधनात अडकलं. या हटके लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण नवरा ...
ग ल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल अखेर लग्नबंधनात अडकलं. या हटके लग्नाची चांगलीच चर्चा रंगली होती. कारण नवरा मुलगा ५२ वर्षाचा तर नवरीचे वय २७ वर्षे. दोघांमध्ये २५ वर्षांचा फरक असूनही अखेर हे कपल रेशीमगाठीत अडकले. हे कपल म्हणजे मॉडेल-अभिनेता मिलिंद सोमण आणि अंकिता कंवर. अलिबागमध्ये मिलिंद आणि अंकिताचा विवाहसोहळा कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडला. दोघांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. आता हे नवदाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याला निमित्त ठरला आहे तो आयर्न मॅन मिलिंद सोमणचा पत्नी अंकितासह अंडरवॉटर रोमान्स. खुद्द अंकितानेच सोशल मीडियावर अंडरवॉटर रोमान्सचा सेल्फी शेअर केला आहे. यांत मिलिंद आणि अंकिता रोमँटिक पोजमध्ये एकमेकांच्या जवळ आल्याचे पाहायला मिळत आहे. जिथे सावलीही प्रकाशाच्या प्रेमात पडायला शिकेल अशी कॅप्शन अंकिताने या फोटोला दिली आहे. मिलिंद आणि अंकिता अंडरवॉटर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांआधी मिलिंद आणि अंकिता यांचे हनीमून फोटोसुद्धा व्हायरल झाले होते. यापैकी एका फोटोत मिलिंद आणि अंकिता एकत्र वृक्षारोपण करत असल्याचे पाहायला मिळालं होतं. हा फोटोसुद्धा अंकितानेच शेअर केला होता. आतापर्यंत दोघांनी अकरा झाडं लावल्याची माहिती देणारं कॅप्शनही अंकिताने या फोटोला दिले होते. अंकिता ही मिलिंदची दुसरी पत्नी आहे. २००६ साली मिलिंदने फ्रेंच अभिनेत्री मेलिन जंपानोई हिच्याशी लग्न केले होते. मात्र आता दीड वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मिलिंद आणि अंकिता लग्नबंधनात अडकले आहेत. अंकिता मूळची दिल्लीची रहिवाशी असून तिचे खरे नाव सुंकुस्मिता कंवर आहे.