५४ वर्षीय मराठमोळी अभिनेत्री बनू शकली नाही आई? खुद्द तिनेच सांगितलं यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 11:39 IST2024-12-07T11:37:37+5:302024-12-07T11:39:59+5:30

मराठमोळ्या अभिनेत्रीने आई न बनता आल्याची खंत व्यक्त केली आहे.

54-year-old Marathmoli Actress Ashwini Kalsekar could not become mother? She herself told the reason behind this | ५४ वर्षीय मराठमोळी अभिनेत्री बनू शकली नाही आई? खुद्द तिनेच सांगितलं यामागचं कारण

५४ वर्षीय मराठमोळी अभिनेत्री बनू शकली नाही आई? खुद्द तिनेच सांगितलं यामागचं कारण

अभिनेत्री अश्विनी काळसेकर (Ashwini Kalsekar) 'कसम से' मधील 'जिग्यासा' या भूमिकेसाठी ओळखली जाते. तिने २००९ मध्ये हिंदी आणि साउथमधील प्रसिद्ध अभिनेता मुरली शर्मा(Murli Sharma)शी लग्न केले. ५४ वर्षीय अभिनेत्रीला प्रेग्नेंसीसाठी खूप संघर्ष करावा लागला आणि ती कधीच आई होऊ शकली नाही. मूल होण्याचा निर्णय घेणे हा स्त्रीसाठी मोठा निर्णय असतो. जेव्हा असे होत नाही तेव्हा महिलांच्या मानसिक आरोग्यावर निश्चितच परिणाम होतो.

हॉटरफ्लायच्या 'द मेल फेमिनिस्ट'ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, सिद्धार्थ अलाम्बायनने विचारले की तिने आणि मुरलीने मुले होण्याचा विचार केला आहे का? अश्विनीने सांगितले की, तिला आणि तिच्या पतीला मुले हवी आहेत. मात्र, तिला किडनीचा त्रास आहे आणि तिला सरोगसीबद्दल फारशी माहिती नव्हती.

अभिनेत्री का होऊ शकली नाही आई?
ती म्हणाली की, 'खरं सांगायचं तर आम्ही प्रयत्न केला पण मी म्हटल्याप्रमाणे मला किडनीचा त्रास होता आणि त्यावेळी सरोगसीची फॅशन नव्हती. आमच्याकडे इतके पैसे नव्हते. आम्ही अजूनही सेटल होतो आहे, धडपडत होतो आणि पुन्हा प्रयत्न केला आणि एका क्षणी डॉक्टर म्हणाले की तुमची किडनी भार उचलू शकणार नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःचे किंवा मुलाचे नुकसान कराल आणि मग ते होऊ शकले नाही.

मूल होऊ शकले नाही
मुलाखतीत पुढे अश्विनीने म्हटले की, वय झाले आणि काही काळानंतर, एखाद्या महिलेचे शरीर लहान मुलाच्या मागे धावण्यासाठी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या योग्य नसते. ती म्हणाली, 'मला मूल होऊ शकले नाही. खरंतर हा नशीबाचा भाग आहे. वाईट तर वाटते. मला पूर्ण वर्तुळात जगायचे आहे पण ते शक्य झाले नाही. कदाचित मला माझ्या सासरची आणि आई-वडिलांची सेवा करायची होती आणि ते आमच्यासोबत आहेत, म्हणून मी ते करत आहे.

रजोनिवृत्तीनंतर सर्व काही बिघडले
अश्विनीने सांगितले की, ५१ वर्षांची असताना ती रजोनिवृत्तीत गेली आणि हा खूप कठीण काळ होता. तिचे वजन खूप कमी झाले आणि तिचे शारीरिक स्वास्थ्य बिघडले. मात्र, बरी झाल्यानंतर ती खूप मजबूतीने उभी राहिली. त्याच मुलाखतीत, अभिनेत्रीने खुलासा केला की तिला स्वतःची मुले नसली तरी तिच्याकडे २ कुत्रे आहेत जे तिच्या मुलांसारखे आहेत. त्यांच्यासाठी तिने एक प्रोफेशनल आया देखील ठेवली आहे. 
 

Web Title: 54-year-old Marathmoli Actress Ashwini Kalsekar could not become mother? She herself told the reason behind this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.