६१ वर्षांच्या या अभिनेत्याने कमी केले २५ किलो वजन, एकाचवेळी साईन केलेत सहा सिनेमे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2018 07:01 AM2018-02-18T07:01:23+5:302018-02-18T12:31:23+5:30
बॉलिवूड अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक दीर्घकाळापासून स्वत:च्या वाढत्या वजनामुळे चिंतीत होते. त्यांचे वजन इतके वाढले होते की त्यांना ...
ब लिवूड अभिनेते व दिग्दर्शक सतीश कौशिक दीर्घकाळापासून स्वत:च्या वाढत्या वजनामुळे चिंतीत होते. त्यांचे वजन इतके वाढले होते की त्यांना चालणे-फिरणेही कठीण झाले होते. मग बॉलिवूडमध्ये काम मिळणे तर दूरच. पण आता त्यांची ही चिंता दूर झालीयं. होय, कारण सतीश कौशिक यांनी चार-पाच किलो नाही तर तब्बल २५ किलो वजन कमी केले आहे. वजन कमी केल्यानंतरचे सतीश यांचे लूक सगळ्यांना अवाक् करणारे आहे. या लूकमध्ये ते चांगलेच हॅण्डसम दिसत आहेत. विशेष म्हणजे, वजन कमी करताच सतीश यांनी एकाचवेळी सहा चित्रपटही साईन केले आहेत. शाद अली यांचा ‘सूरमा’, आशू त्रिखा यांचा ‘वीरे दी वेडिंग’, ‘यमला पगला दीवाना3’ आणि ‘नमस्ते इंग्लंड’ या बड्या चित्रपटांचा यात समावेश आहे.
वजन कमी केल्यानंतर साहजिकच सतीश प्रचंड आनंदी आहेत. २५ किलो वजन कमी केल्याबद्दल अलीकडे एका मुलाखतीत ते बोलले. वाढत्या वजनाने माझ्या अडचणी वाढवल्या होत्या. मला आरोग्यविषयक कुठलीच समस्या नव्हती. पण मी पायी चालणे कठीण झाले होते. ४० वर्षे कुठल्याही ब्रेकविना काम केल्यामुळे माझ्यातील ऊर्जा अतिशय कमी झाली होती. वजन वाढल्याने मी आणखीच सुस्तावत चाललो होतो. यादरम्यान लॉस एंजिल्समध्ये डॉ. क्रिश्चियन मिडलटन यांच्याशी माझी ओळख झाली. त्यांनी दिलेल्या डाएट प्लानने मात्र माझे आयुष्य बदलले. डॉक्टरांशिवाय माझे मित्र, अनिल कपूर, निर्माता गुनीत मोंगा यांनीही वजन कमी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. आता मी माझ्या मुलींसोबत अगदी आधीसारखी दंगामस्ती करू शकतोय, याचा मला अधिक आनंद आहे, असे त्यांनी सांगितले.
सतीश कौशिक यांनी आपल्या करिअरची सुरूवात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून केली होती. शेखर कपूर दिग्दर्शित ‘मासूम’ या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले होते. सोबतच यात अभिनयही केला होता. अनिल कपूर आणि श्रीदेवी स्टारर ‘रूप की रानी चोरो का राजा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शक क्षेत्रात पाऊल ठेवले होते.