63rd Jio filmfare awards 2018​ : ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कारात इरफान खान, विद्या बालनची बाजी! राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अवार्ड!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 04:46 AM2018-01-21T04:46:53+5:302018-01-21T10:33:16+5:30

बॉलिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठित मानल्या जाणा-या पुरस्कारांपैकी एक असलेला ६३वा  जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईत शनिवारी पार पडला.  शाहरूख खान, ...

63rd Jio filmfare awards 2018: Irrfan Khan at the 63rd Filmfare Awards, Vidya Balan's play! Rajkumar Rao Best Critics Award !! | 63rd Jio filmfare awards 2018​ : ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कारात इरफान खान, विद्या बालनची बाजी! राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अवार्ड!!

63rd Jio filmfare awards 2018​ : ६३ व्या फिल्मफेअर पुरस्कारात इरफान खान, विद्या बालनची बाजी! राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स अवार्ड!!

googlenewsNext
लिवूडमधील सर्वाधिक प्रतिष्ठित मानल्या जाणा-या पुरस्कारांपैकी एक असलेला ६३वा  जिओ फिल्मफेअर पुरस्कार सोहळा मुंबईत शनिवारी पार पडला.  शाहरूख खान, सलमान खान आणि हृतिक रोशन याला पछाडत इरफान खान याने सर्वाेत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारावर नाव कोरले. ‘हिंदी मीडियम’साठी बेस्ट अ‍ॅक्टर (पॉप्युलर) चा पुरस्कार इरफानला मिळाला.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून विद्या बालनने बाजी मारली. तर, सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अवॉर्ड) राजकुमार राव आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अवॉर्ड) जायरा वसीम यांनी मोहोर उमटवली. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री माला सिन्हा आणि संगीतकार बप्पी लाहिरी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा मुंबईतील गोरेगाव येथील एनएससीआय, एसव्हीपी स्टेडियमवर रंगला होता. यावेळी अनेक बॉलिवूडमधील दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली होती.  

पुरस्कार विजेते खालील प्रमाणे - 
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) : इरफान खान, हिंदी मिडिअम
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिका) : विद्या बालन, तुम्हारी सुलु  
- सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स अवॉर्ड) : राजकुमार राव, ट्रॅप्ड
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स अवॉर्ड) : जायरा वसीम, सीक्रेट सुपरस्टार 
 - सर्वाधिक चित्रपट (लोकप्रिय): हिंदी मीडिअम 
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकणा सेन शर्मा (अ डेथ इन द गंज)  
-सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी) 
- सर्वोत्कृष्ट कथा : अमित मसुरकर (न्यूटन) 
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर विज (सिक्रेट सुपरस्टार) 
- सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश कैवल्य (शुभ मंगल सावधान) 
- सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशिष भुतियानी (मुक्ती भवन) 
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचदी फेरा - सिनेमा सिक्रेट सुपरस्टार)
- सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंह (रोके रुके ना नैना - बद्रीनाथ की दुल्हनिया) 
- सर्वोत्कृष्ट गीत : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा - सिनेमा जग्गा जासूस) 

Web Title: 63rd Jio filmfare awards 2018: Irrfan Khan at the 63rd Filmfare Awards, Vidya Balan's play! Rajkumar Rao Best Critics Award !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.