65th National Film Awards 2018 : बोनी कपूर, जान्हवी कपूर, अक्षय खन्ना यांनी स्वीकारले पुरस्कार, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2018 02:06 PM2018-05-03T14:06:18+5:302018-05-03T20:16:54+5:30

६५वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतील विज्ञान भवन येथे अतिशय दिमाखदारपणे पार पडत आहे. आज सकाळपासून या सोहळ्याला काहीसे ...

65th National Film Awards 2018: Boney Kapoor, Jhanwi Kapoor, Akshay Khanna Award, Award photo! | 65th National Film Awards 2018 : बोनी कपूर, जान्हवी कपूर, अक्षय खन्ना यांनी स्वीकारले पुरस्कार, पाहा फोटो!

65th National Film Awards 2018 : बोनी कपूर, जान्हवी कपूर, अक्षय खन्ना यांनी स्वीकारले पुरस्कार, पाहा फोटो!

googlenewsNext
वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीतील विज्ञान भवन येथे अतिशय दिमाखदारपणे पार पडत आहे. आज सकाळपासून या सोहळ्याला काहीसे वादाचे ग्रहण लागले होते. ज्यामुळे एक समूहाकडून त्यास तीव्र विरोध करण्यात आला होता. सुरुवातीला असे म्हटले जात होते की, केवळ ११ पुरस्कार प्राप्त लोकांनाच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. तर उर्वरित पुरस्कार प्राप्त लोकांना सूचना तथा प्रसारण मंत्री स्मृती ईरानी यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे. मात्र या निर्णयावर काही पुरस्कार प्राप्त लोकांनी तीव्र आक्षेप घेत नाराजी व्यक्त केली. काहींनी तर यावर बहिष्कार टाकण्यावरही वक्तव्य केले. 



दरम्यान, या सर्व वादानंतरही पुरस्कार सोहळ्यास प्रारंभ झाला असून, स्मृती ईरानी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार दिले जात आहेत. दरम्यान, ६ वाजून १५ मिनिटांच्या आसपास राष्टÑपती रामनाथ कोविंद यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि विनोद खन्ना यांच्याविषयी बोलताना म्हटले की, ‘आम्ही दोन्ही कलाकारांचे स्मरण करीत असून, कायम ते आमच्या स्मरणात असतील. ‘लम्हे’ आणि ‘मेरे अपने’ यांसारख्या चित्रपटांनी केवळ बॉक्स आॅफिसवरच चांगला व्यवसाय केला नाही तर, प्रेक्षकांची मनेही जिंकली. जेव्हा विनोद खन्ना आणि श्रीदेवी यांचे निधन झाले तेव्हा कोट्यवधी सिनेप्रेमींना वाटले की, आपल्या जवळच्या व्यक्तीचेच निधन झाले. या दोन्ही कलाकारांची लोकप्रियता एका क्षेत्रापुरती मर्यादित नव्हती तर देशातील प्रत्येक कोपºयात त्यांचे चाहते आहेत. हेच आपल्या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. आपली फिल्म इंडस्ट्री आपल्याला एक सूत्रात बांधण्यास मदत करते. 





यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी श्रीदेवी यांचा सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार बोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूरला प्रदान केला. तर विनोद खन्ना यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांचा मुलगा अक्षय खन्ना याने स्वीकारला. फहद फासिल यांनी पुरस्कार सोहळ्यात हजेरी न लावताच कोची गाठले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पत्नी सविता कोविंदसोबत विज्ञान भवन येथे उपस्थित होते. 





या सोहळ्यात ‘बाहुबली-२’ला सर्वाधिक लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भनीता दासला विलेज रॉकस्टारसाठी सर्वश्रेष्ठ बालकलाकारांच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर शाशा तिरुपतीला बेस्ट फिमेल प्लेबॅक सिंगर या पुरस्काराने गौरविण्यात आले. तर अभिनेत्री दिव्या दत्ताने ‘इरादा’ या चित्रपटासाठी सर्वश्रेष्ठ सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार ग्रहण केला. 





अ‍ॅक्शन दिग्दर्शक किंग सोलोमोल यांना ‘बाहुबली-२’साठी रजत कमळ मिळाले. कोरिओग्राफर गणेश आचार्यला ‘गोरी तू गट्ठ मार’साठी दुसरे रजत कमळ मिळाले. निर्देशक अमित वी. मसूरकर यांना ‘न्यूटन’साठी सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘गाजी’ या चित्रपटाचे निर्माता प्रसाद वी यांना सर्वश्रेष्ठ तेलगू चित्रपटाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंकज त्रिपाठीला ‘न्यूटन’ या चित्रपटासाठी स्पेशल मेन्शन अवॉर्ड देण्यात आला. 

Web Title: 65th National Film Awards 2018: Boney Kapoor, Jhanwi Kapoor, Akshay Khanna Award, Award photo!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.