67th National Film Awards: राष्ट्रीय पुरस्कारात चौथ्यांदा कंगना रणौत ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज वाजपेयी आणि धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 05:28 PM2021-03-22T17:28:44+5:302021-03-22T18:28:25+5:30
छिछोरे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर मराठमोळ्या पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
कोरोना व्हायरसने जगात घातलेल्या थैमानामुळे राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा यंदा उशिरा करण्यात आली. या वर्षी कंगना रणौतने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा तर मनोज वाजपेयी आणि धनुषने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला. छिछोरे हा चित्रपट सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट ठरला तर मराठमोळ्या पल्लवी जोशीला सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली असून राष्ट्रीय पुरस्काराची संपूर्ण यादी पुढीलप्रमाणे-
सर्वोत्कृष्ट चित्रपट
मर्कर लॉयन ऑफ द अरेबियन सी
सर्वोत्कृष्ट एडिटिंग
जर्से (तेलुगू)
सर्वोत्कृष्ट गायिका
सावनी रविंद्र - बार्डो
सर्वोत्कृष्ट गायक
बी प्राक
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री
पल्लवी जोशी
सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता
विजय सेतुपथी
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
कंगना रणौत (मनिकर्णिका, पंगा)
सर्वोत्कृष्ट अभिनेता
मनोज वाजपेयी (भोसले)
धनुष (तमीळ)
सर्वोत्कृष्ट स्पेशल मेन्शन
बिरयानी (मल्याळम)
जौनकी पोरा (आसामी)
लता भगवान करे (मराठी)
पिकासू (मराठी)
सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म
बार्डो
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
छिछोरे
सामाजिक प्रश्नांवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
आनंदी गोपाळ
राष्ट्रीय इंटर्गेशनवरील सर्वोत्कृष्ट चित्रपट
ताजमहाल