National Film Award 2023 : आलिया आणि क्रिती सेनॉन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘पुष्पा’ ठरला बेस्ट हिरो
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2023 18:35 IST2023-08-24T18:33:45+5:302023-08-24T18:35:07+5:30
६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी (२४ जुलै) या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

National Film Award 2023 : आलिया आणि क्रिती सेनॉन सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, ‘पुष्पा’ ठरला बेस्ट हिरो
मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. गुरुवारी (२४ जुलै) या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट, अभिनेता आणि अभिनेत्री यांची लिस्ट समोर आली आहे. ६९व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बॉलिवूडचा डंका पाहायला मिळत आहे.
६९व्या राष्ट्रीय पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींनी नाव कोरलं आहे. अभिनेत्री आलिया भट्टला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटासाठी तर क्रिती सेनॉनला मिमी या चित्रपटातील भूमिकेसाठी यंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार दाक्षिणात्य अभिनेत्याला देण्यात आला आहे. पुष्पा चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
अभिनेत्री पल्लवी जोशी आणि अभिनेता पंकज त्रिपाठी या कलाकारांना सहाय्यक भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ मधील भूमिकेसाठी पल्लवी जोशीला तर ‘मिमी’ चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक कलाकार हा पुरस्कार देण्यात आला आहे.
दरम्यान,१९५४ साली हा पुरस्कार सोहळा सुरु करण्यात आला. यात चित्रपट, साहित्य आणि कला क्षेत्रात सर्वोत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना भारत सरकारकडून हे पुरस्कार दरवर्षी दिले जातात.