बॉलिवूडचे हे स्टार्स १२वी पर्यंतचही शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2018 03:36 PM2018-07-17T15:36:00+5:302018-07-17T15:36:23+5:30

बॉलिवूडमध्ये एकीकडे उच्चशिक्षित कलाकार बघायला मिळतात तर दुसरीकडे मात्र काही असेही मोठे स्टार आहेत जे केवळ १२ पर्यंतच शिक्षण घेऊ शकले.

7 Bollywood celebrities who are not even 12th pass | बॉलिवूडचे हे स्टार्स १२वी पर्यंतचही शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत!

बॉलिवूडचे हे स्टार्स १२वी पर्यंतचही शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत!

बॉलिवूड कलाकारांची कमाई, त्यांचं लाइफस्टाईल याबाबत नेहमीच चर्चा केली जाते. त्यांच्या अफेअर आणि कामांचीही चर्चा होते. पण बॉलिवूड कलाकारांच्या शिक्षणाबाबत फारशी चर्चा होत नाही. बॉलिवूडमध्ये एकीकडे उच्चशिक्षित कलाकार बघायला मिळतात तर दुसरीकडे मात्र काही असेही मोठे स्टार आहेत जे केवळ १२ पर्यंतच शिक्षण घेऊ शकले. काहींनी तर १२ वी सुद्धा पूर्ण केली नाही. चला जाणून घेऊया त्या कलाकारांबाबत.....

१) सलमान खान

बॉलिवूडचा सर्वाधिक लोकप्रिय अभिनेता सलमान खान याचं शालेय शिक्षण सिंधीया स्कूल, ग्वालियर आणि सेंटलॉस हायस्कूल वांद्रे येथून झालं. पण त्याला शिक्षणात काहीही रस नव्हता. त्याने १२ वी सुद्धा पूर्ण केली नाही. त्याने लगेच बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. 

२) आमिर खान

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून लोकप्रिय असलेला अभिनेता आमिर खान याचं शालेय शिक्षण मुंबईतील वेगवेगळ्या शाळांमधून झालं. पण त्यालाही हे जमलं नाही. त्यानेही शिक्षण सोडून सिनेमात काम करणे सुरु केले. 

३) करिश्मा कपूर

करिश्मा कपूर ही वयाच्या १६ व्या वर्षी बॉलिवूडमध्ये दाखल झाली होती. एकापाठी एक सुपरहिट सिनेमे देत असल्याने तिला तिच १२वी पर्यंतचही शिक्षण पूर्ण करता आलं नाही. 

४) अर्जून कपूर

'इशकझादे' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणारा अर्जून कपूर आता बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो. अर्जून कपूर हा १२ वी मध्ये नापास झाला होता. त्यामुळे त्याने पुढे शिक्षण केलं नाही. 

५) काजोल

बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली काजोल ही पाचगणी येथील सेंट सोसेफ स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. ती शाळेत असताना वेगवेगळ्या इव्हेंट्समध्ये भाग घेत होती. पण अशातच तिला 'बेखुदी' हा पहिला सिनेमा मिळाला. त्यानंतर तिने शिक्षण सोडून दिलं. 

६) कतरिना कैफ

अभिनेत्री कतरिना कैफने तिचं मॉडेलिंगचं करिअर वयाच्या १४ व्या वर्षी सुरु केलं. त्यामुळे ती पुढील शिक्षण पूर्ण करू शकली नाही. 

७) कंगना राणावत

बॉलिवूड क्वीन कंगना राणावत हिने वयाच्या १७ व्या वर्षीत शिक्षण सोडलं. कारण तिला सिनेमात काम करायचं होतं.  
 

Web Title: 7 Bollywood celebrities who are not even 12th pass

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.