‘गँग ऑफ वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; असे का म्हणाला अनुराग कश्यप?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 01:50 PM2019-06-23T13:50:29+5:302019-06-23T14:06:01+5:30

अनुराग कश्यपचा ‘गँग ऑफ वासेपूर’ जबरदस्त हिट झाला होता. काल २२ जूनला या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झालीत.  ‘गँग ऑफ  वासेपूर’ याच चित्रपटाने अनुराग कश्यपला ख-या अर्थाने ओळख दिली. पहिल्या भागासोबतच त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. पण अनुरागचे मानाल तर, या चित्रपटाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले.

7 years of gangs of wasseypur anurag kashyap says this film has ruined my life | ‘गँग ऑफ वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; असे का म्हणाला अनुराग कश्यप?

‘गँग ऑफ वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले; असे का म्हणाला अनुराग कश्यप?

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटात कोळसा खाणीने समृद्ध असलेल्या वासेपुर गावावर अधिराज्य गाजविण्यासाठी दोन माफिया कुटुंबियांमधील गँगवॉर दाखविण्यात आले आहे. 

अनुराग कश्यपचा ‘गँग ऑफ वासेपूर’ जबरदस्त हिट झाला होता. काल २२ जूनला या चित्रपटाला 7 वर्षे पूर्ण झालीत.  ‘गँग ऑफ वासेपूर’ याच चित्रपटाने अनुराग कश्यपला ख-या अर्थाने ओळख दिली. पहिल्या भागासोबतच त्याचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला. पण अनुरागचे मानाल तर, या चित्रपटाने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले.
होय, अनुरागने खुद्द तसे ट्विट केले आहे. ‘आजपासून सात वर्षांपूर्वी माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. तेव्हापासून प्रत्येकाला हेच वाटतेय की, मी  ‘गँग ऑफ  वासेपूर’ सारखेच चित्रपट पुन्हा पुन्हा बनवावेत.मी मात्र यापासून दूर पळण्याचा अयशस्वी प्रयत्न करतोय. 2019 अखेरपर्यंत ही साडेसाती दूर होईल, अशी आशा करतो,’ असे ट्विट त्याने केले.




आपल्या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळावे, खरे तर कुठल्याही दिग्दर्शकाला हेच हवे असते. त्यामुळे ‘गँग ऑफ  वासेपूर’ या चित्रपटाला मिळालेली लोकप्रियता, त्याला मिळालेले प्रेम अनुराग कश्यपसाठीही महत्त्वाचे आहे. पण अनुराग हा पूर्वापार वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट बनण्यासाठी ओळखला जातो. अशात त्याने केवळ ‘गँग ऑफ वासेपूर’सारखेच चित्रपट  करावेत, ही चौकट त्याला मान्य असूच शकत नाही. याचमुळे  ‘गँग ऑफ  वासेपूर’ने माझे आयुष्य उद्ध्वस्त केले, असे त्याने म्हटले आहे. आता या अपेक्षांपलीकडे जाऊन काहीतरी वेगळे करण्याचा अनुरागचा मनसुबा किती यशस्वी होतो, ते बघूच.


 दोन भागात बनलेला ‘गँग ऑफ  वासेपूर’2012 मध्ये रिलीज झाला होता. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातील वासेपूरवर आधारित या चित्रपटात मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, हुमा कुरेशी, पीयुष मिश्रा, रिचा चड्डा मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात कोळसा खाणीने समृद्ध असलेल्या वासेपुर गावावर अधिराज्य गाजविण्यासाठी दोन माफिया कुटुंबियांमधील गँगवॉर दाखविण्यात आले आहे. 

Web Title: 7 years of gangs of wasseypur anurag kashyap says this film has ruined my life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.