सेक्स वर्करवर आधारित 'हे' 8 चित्रपट पाहिलेत का? भीषण वास्तवाचा केलाय उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2022 08:00 AM2022-07-28T08:00:00+5:302022-07-28T08:00:00+5:30

Indian movies: अलिकडेच 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातून सेक्स वर्करच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला. मात्र, या चित्रपटापूर्वी कलाविश्वात अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे.

8 indian movies based on Prostitute and their life | सेक्स वर्करवर आधारित 'हे' 8 चित्रपट पाहिलेत का? भीषण वास्तवाचा केलाय उलगडा

सेक्स वर्करवर आधारित 'हे' 8 चित्रपट पाहिलेत का? भीषण वास्तवाचा केलाय उलगडा

googlenewsNext

कलाविश्वात सध्या अनेक दिग्दर्शक, निर्माते नवनवीन प्रयोग करु पाहात आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या, कथानकांच्या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. अलिकडेच 'गंगुबाई काठियावाडी' या चित्रपटातून सेक्स वर्करच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसादही दिला. मात्र, या चित्रपटापूर्वी कलाविश्वात अशा अनेक चित्रपटांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे सेक्स वर्करवर आधारित चित्रपट कोणते ते पाहुयात.
 

१. मंडी -

१९८३ मध्ये श्याम बेनेगल यांनी मंडी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. शबाना आझमी, स्मिता पाटील, नीना गुप्ता, नसिरुद्दीन शाह यांची या चित्रपटात मुख्य भूमिका होती. पाकिस्तानी लेखक गुलाम अब्बास यांच्या शॉर्ट स्टोरीवर हा चित्रपट आधारित असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटात काही नेतेमंडळी आपल्या फायद्यासाठी एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा वापर करतात. भ्रष्टाचार आणि दुटप्पी भूमिका असलेले पुरुष यांच्यावर हा चित्रपट भाष्य करतो.

२. गिद्द-

स्मिता पाटील, ओम पुरी आणि नाना पाटेकर यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट १९८४ मध्ये प्रदर्शित झाला. टी.एस. रंगा यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. कर्नाटक-महाराष्ट्र बॉर्डरवरील एका गावातील कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. या गावामध्ये देवदासी परंपरा पाळली जात असून मुलींना देवी येल्लम्माच्या सेवेसाठी वाहण्यात येतं. या मुलींचा जमीनदार, पुजारी आणि गावातील अन्य लोक फायदा घेतात. 

३. चांदनी बार-

चांदनी बार हा चित्रपट तर साऱ्यांनाच ठावूक आहे. मधूर भांडारकर यांनी २००१ मध्ये हा चित्रपट तयार केला. यात तब्बू आणि अतुल कुलकर्णी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात एका मुलीची कथा उलगडण्यात आली आहे जिचे आई-वडील दंगलीत मारले जातात. परिणामी, ती तिच्या काकांसोबत मुंबईत येते. पण तिचे काका तिला चांदनी बारमध्ये काम करायला लावतात. येथेच तिच्यावर बलात्कारही करण्यात येतो. यात सेक्स वर्कर्सला कशाप्रकारे लैंगिक अत्याचार, ग्राहकांच्या विचित्र मागण्यांचा सामना करावा लागतो हे सांगण्यात आलं आहे.

४. चमेली -

२००३ मध्ये अनंत बलानी आणि सुधीर मिश्रा दिग्दर्शत चमेली हा चित्रपट प्रदर्शित झाला. यात अभिनेत्री करीना कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे.  तसंच तिच्यासोबत अभिनेता राहूल बोसही मुख्य भूमिकेत झळकला आहे.

५. टेल्स ऑफ नाइट फेयरीज़ -

२०० ३ मध्ये ही डॉक्युमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला आली. शोहिन घोष यांनी हिचं दिग्दर्शन केलं आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये एका खऱ्याखुऱ्या सेक्स वर्करने काम केलं आहे.

६. लक्ष्मी-

मोनाली ठाकूरची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात लक्ष्मी या लहान मुलीची कथा उलगडण्यात आली आहे. जिचं अपहरण करुन तिला वेश्या व्यवसायात ढकललं जातं. नागेश कुकनूर यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे. यात सतीश कौशिक, राम कपूर आणि शेफाली शाह झळकले आहेत.

७. टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब -

चित्रांगदा चक्रवर्ती आणि विभावरी देशपांडे यांचा टिकली अँड लक्ष्मी बॉम्ब हा चित्रपट आदित्य कृपलानी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात मुंबईत राहणाऱ्या टिकली आणि लक्ष्मी या दोन सेक्स वर्करची कथा सांगण्यात आली आहे.

८. बेगम जान

२०१७ साली आलेला विद्या बालनचा बेगम जान चित्रपट बराच चर्चेत राहिला. गौहर खान, इला अरुण आणि नसीरुद्दीन शाह या चित्रपटात झळकले आहेत. बेगम जान पीरियड फिल्म असून यात १९४७ च्या काळातील सेक्स वर्करचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. यात विद्या बालनने बेगम जानची भूमिका साकारली आहे. यात भारत-पाकिस्तान विभाजनानंतर ऐन सिमेवर असलेल्या बेगमचा कोठा रिकामा करण्यात करण्याचे आदेश दिले जातात.  पण बेगम जान ऐकण्यास तयार होत नाही.

Web Title: 8 indian movies based on Prostitute and their life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.