'जान तेरे नाम' या सिनेमातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री दीर्घ काळापासून आहे गायब, आता ओळखणेही झाले कठिण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 06:00 AM2020-08-19T06:00:00+5:302020-08-19T06:00:00+5:30
90 च्या दशकातील गाजलेल्या 'जान तेरे नाम' या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली अभिनेत्री फरहीन दीर्घ काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. 1997 मध्ये फरहीनने क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत गुपचुप लग्न थाटले आणि बॉलिवूडपासून सन्यांस घेतला. लग्नानंतर फरहीन नव-यासोबत दिल्लीला स्थायिक झाली.
'जान तेरे नाम' या चित्रपटानंतर फरहीन 1994 साली आलेला चित्रपट 'नजर के सामने'मध्ये अक्षय कुमारसोबत रोमान्स करताना दिसली होती. विशेष म्हणजे यापूर्वी ती अक्षय कुमार स्टारर 'सैनिक' या चित्रपटात त्याच्या बहिणीच्या भूमिकेत झळकली होती. 1997 मध्ये फरहीनने क्रिकेटपटू मनोज प्रभाकरसोबत गुपचुप लग्न थाटले आणि बॉलिवूडपासून सन्यांस घेतला. लग्नानंतर फरहीन नव-यासोबत दिल्लीला स्थायिक झाली. 'जान तेरे नाम'चे दिग्दर्शक बलराज साहनी विज यांनी याच चित्रपटाच्या सिक्वेलसाठी फरहीनला विचारणा केली होता. पण तिने आईची भूमिका साकारण्यास नकार दिला होता. तारुण्यात आईची भूमिका करणार नसल्याचे तिने कारण पुढे केले होते.
फरहीन आता यशस्वी बिझनेसवुमन आहे. दिल्लीत तिचा हर्बल स्किनकेअर प्रॉडक्ट्सचा व्यवसाय आहे. नॅचरल हर्ब्स असे तिच्या कंपनीचे नाव आहे. 18 वर्षांपूर्वी नव-यासोबत फरहीनने ही कंपनी सुरु केली होती. आज या कंपनीचा टर्न ओव्हर कोटींच्या घरात आहे.
फरहीनचे लूक्स 90 च्या दशकातील सुपरस्टार माधुरी दीक्षितसोबत मिळतेजुळते आहेत. त्यामुळे तिच्या चाहत्यांची फॅन फॉलोइंगसुद्धा झपाट्याने वाढली होती. पण लग्नानंतर फरहीनने सिनेसृष्टीपासून सन्यांस घेतल्याने तिचे चाहते निराश झाले होते. अक्षय कुमारची बहीण आणि प्रेयसीच्या रुपात फरहीन झळकली होती.
1993 आली आलेला चित्रपट 'सैनिक' मध्ये फरहीनने अक्षय कुमारच्या बहिणीची भूमिका वठवली होती. त्यानंतर आलेल्या 'नजर के सामने' (1994) या चित्रपटात तिने अक्षयच्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. फरहीन पहिले अक्षयची बहीण झाली आणि नंतर त्याच्यासोबत मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसली. बॉलिवूडपासून दूर असली तरीही पती मनोज प्रभाकरसह तिची खाजगी आयुष्य एन्जॉय करते.