'भूल भुलैया ३'बद्दल मोठी अपडेट आली समोर, अभिनेत्यानेच दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:08 PM2024-08-31T12:08:56+5:302024-08-31T12:10:39+5:30

Bhool Bhulaiya 3 : अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया २' २०२२ साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच 'भूल भुलैया ३'ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

A big update about 'Bhool Bhulaiya 3' has come out, the actor himself gave the information | 'भूल भुलैया ३'बद्दल मोठी अपडेट आली समोर, अभिनेत्यानेच दिली माहिती

'भूल भुलैया ३'बद्दल मोठी अपडेट आली समोर, अभिनेत्यानेच दिली माहिती

बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता कार्तिक आर्यन(Kartik Aaryan)चा चित्रपट 'भूल भुलैया २' (Bhool Bhulaiya 2) २०२२ साली थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तेव्हापासून या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची म्हणजेच 'भूल भुलैया ३'(Bhool Bhulaiya 3)ची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया ३' हा चित्रपट या दिवाळीत प्रदर्शित होणार असून चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. हा चित्रपट दिवाळीला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनने असे अपडेट दिले आहे की चाहते खूश होतील. 'भूल भुलैया ३' चित्रपटाबाबत कार्तिक आर्यनने काय अपडेट दिले आहे ते जाणून घेऊया.

अभिनेता कार्तिक आर्यन एका समिट दरम्यान 'भूल भुलैया ३'बद्दल बोलला. कार्तिक आर्यनने सांगितले की, पोस्ट प्रोडक्शन जवळपास पूर्ण झाले आहे. टीझर पाहण्याची चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसात येणार आहे. हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित होत आहे, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. टीझर खूप छान बनवला आहे. कार्तिक आर्यन पुढे म्हणाला, 'संपूर्ण टीमने हा चित्रपट पाहिला आहे आणि प्रत्येकजण खूप आनंदी आहे. चित्रपटाचे अंतिम काम सुरू असून लवकरच टीझर, ट्रेलर आणि गाणी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. काही दिवसात तुम्हा सर्वांना चित्रपटाचा टीझर, ट्रेलर, गाणी आणि शेवटी चित्रपट पाहायला मिळणार आहे.

'भूल भुलैया ३' हा चित्रपट दिवाळीला होणार प्रदर्शित
उल्लेखनीय आहे की अक्षय कुमार 'भूल भुलैया'मध्ये दिसला होता आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. यानंतर कार्तिक आर्यनने 'भूल भुलैया २' या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात काम केले आणि तो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता कार्तिक आर्यन 'भूल भुलैया ३' मध्येही काम करताना दिसणार आहे. हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची चाहत्यांची वाट पाहत आहेत. कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भूल भुलैया ३' बॉक्स ऑफिसवर अजय देवगणच्या 'सिंघम अगेन' चित्रपटाशी टक्कर देणार आहे.

Web Title: A big update about 'Bhool Bhulaiya 3' has come out, the actor himself gave the information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.