"बंद खोलीत...", ब्रेकअपनंतर सलमानची झालेली अशी अवस्था, पुतण्याच्या शोमध्ये केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:33 IST2025-02-10T16:32:41+5:302025-02-10T16:33:57+5:30

Salman khan : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे लव्ह लाईफ कोणापासून लपलेले नाही. त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.

''a closed room...'', Salman khan's situation after the breakup, revealed on his nephew's show | "बंद खोलीत...", ब्रेकअपनंतर सलमानची झालेली अशी अवस्था, पुतण्याच्या शोमध्ये केला खुलासा

"बंद खोलीत...", ब्रेकअपनंतर सलमानची झालेली अशी अवस्था, पुतण्याच्या शोमध्ये केला खुलासा

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान(Salman Khan)चे लव्ह लाईफ कोणापासून लपलेले नाही. त्याच्या आयुष्यात अनेक मुली आल्या, पण त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. एक वेळ अशी आली की त्याच्या लग्नाच्या पत्रिकाही छापल्या गेल्या, पण शेवटी लग्न होऊ शकले नाही. ५९ वर्षीय बॅचलर सलमानने अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये त्याच्या ब्रेकअप आणि भूतकाळातील नातेसंबंधांबद्दल खुलेपणाने सांगितले.

सलमान खान त्याचा पुतण्या अरहान खानचा पॉडकास्ट 'डंब बिर्याणी'मध्ये सहभागी झाला होता, जिथे त्याने ब्रेकअप आणि नातेसंबंध हाताळण्यासाठी टिप्स दिल्या. ब्रेकअपची तुलना 'बँडेड'शी करताना सलमान म्हणाला, "जर तुझे गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप झाले तर तिला जाऊ द्या. बाय-बाय. जेव्हा तुम्हाला बँडेड काढावी लागते तेव्हा तुम्ही ते हळू काढता का? नाही ना, ते झटकन काढतो." तो पुढे म्हणाला की, खूप नाटकं करण्यापेक्षा किंवा रडण्यापेक्षा ब्रेकअप लवकर संपवणं चांगलं आहे. खोलीत जावून रडा आणि मुव्ह ऑन व्हा, असा सल्लाही भाईजानने दिला.

सलमानने दिला हा सल्ला
केवळ ब्रेकअपच नाही, तर सलमानने विश्वासघातातून सावरण्याचा मंत्रही दिला. तो म्हणाला की, "एखादे नाते ४०-५० वर्षे जुने असले तरी, तुमच्या पाठीत वार झाल्याचे लक्षात आले, तर पहिल्या ३० सेकंदात त्यातून बाहेर पडण्याची ताकद तुमच्यात असली पाहिजे. फक्त ते पुसून टाका." सलमान पुढे म्हणाला की, त्याने आपल्या मनाला अशा प्रकारे ट्रेनिंग दिले आहे की जेव्हाही आपली फसवणूक होईल तेव्हा त्याला सहा महिने जुनी गोष्ट असल्याचे समजून पुढे जावे. यामुळे वेदना कमी होतील आणि व्यक्ती लवकर त्यातून बाहेर पडेल. सलमान खानने या पॉडकास्टमध्ये असेही म्हटले आहे की, आयुष्यात काहीही घडत असले तरी, व्यक्तीने त्याच्या उद्देशावर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यासाठी सतत काम केले पाहिजे. कधीही कोणाचाही अपमान करू नये आणि 'सॉरी' आणि 'थँक्यू' म्हणण्यात संकोच करू नये.

वर्कफ्रंट
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर भाईजान लवकरच 'सिकंदर'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये रश्मिका मंदानादेखील त्याच्यासोबत दिसणार आहे. एआर मुरुगदास यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनत आहे.

Web Title: ''a closed room...'', Salman khan's situation after the breakup, revealed on his nephew's show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.