लेकीने बनवलं आलियासाठी क्यूट गिफ्ट! नेटिझन्स म्हणतात, "फेकायला लिमीट असते!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 14:13 IST2024-03-08T14:06:45+5:302024-03-08T14:13:12+5:30
आलिया भटच्या लेकीने तिच्यासाठी क्यूट गिफ्ट बनवल्याची चर्चा आहे. त्यामुळे नेटिझन्सच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या आहेत

लेकीने बनवलं आलियासाठी क्यूट गिफ्ट! नेटिझन्स म्हणतात, "फेकायला लिमीट असते!"
आलिया भट ही बॉलिवूडमधील चर्चेतील अभिनेत्री. आलियाला आपण आजवर अनेक विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. आलिया सध्या करिअरच्या शिखरावर आहे. आलियाचा प्रत्येक सिनेमा सध्या बॉक्स ऑफीसवर सुपरहिट असतो. आलिया-रणबीरने काही दिवसांपुर्वी त्यांची लेक राहाला सर्वांसमोर आणलं. राहाला घेऊन आलिया-रणबीर अंबानींच्या लग्नात सुद्धा गेले होते. अशातच आज आलियाने राहाविषयी एक पोस्ट केलीय. यामुळे तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलंय.
झालं असं की... आलिया भट्टने महिला दिनानिमित्त तिची लेक राहाने बनवलेला रेड हार्ट शेअर केला. हा फोटो शेअर करुन आलियाने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "माझ्या आयुष्यातील लहान महिलेने हे माझ्यासाठी बनवले आहे... आणि मी हे तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे.." हे कॅप्शन वाचून आलियाची लेक राहाने तिच्यासाठी हे रेड हार्ट बनवलं असल्याचं दिसतंय. ही पोस्ट व्हायरल होताच लोकांनी आलियाला ट्रोल करायला सुरुवात केली.
आलिया भट्टने शेअर केलेल्या रेड हार्टचा फोटो बघताच नेटिझन्स म्हणाले, "अवघ्या एक वर्षाची लेक एवढं गिफ्ट कसं बनवेल.", "काहीही बोलू नका! फेकायची पण लिमिट असते." अशा कमेंट करत लोकांनी आलियाला चांगलंच ट्रोल केलंय. आलियाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच 'जिगरा' या सिनेमातून भेटीला येणार आहे.