तो आला अन् थेट हातच धरला, तमन्नाने असं काय केलं की होतेय चर्चा; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 13:57 IST2023-08-08T13:55:34+5:302023-08-08T13:57:05+5:30
सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

तो आला अन् थेट हातच धरला, तमन्नाने असं काय केलं की होतेय चर्चा; Video व्हायरल
अभिनेत्री तमन्ना भाटियाचे (Tamannah Bhatia) चाहते साऊथ आणि बॉलिवूड दोन्हीमध्येही आहेत. 'बाहुबली' आणि 'लस्ट स्टोरीज 2' सारख्या सिनेमांमुळे सध्या ती चर्चेत आहे. नुकतीच ती एका सार्वजनिक ठिकाणी पोहोचलेली असताना एक चाहता तिच्या जवळ आला आणि अन् थेट तिचा हातच धरला. सुरक्षारक्षकांना बाजूला करत तो अभिनेत्रीजवळ पोहोचला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर तमन्ना भाटियाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. केरळमधील एका कार्यक्रमात तमन्नाने हजेरी लावली. त्याचवेळी एक चाहता सुरक्षारक्षकांची चौकट तोडत तमन्नाजवळ पोहोचला. इतकंच नाही तर तिचा थेट हातही धरला. हात पकडून तिच्यासोबत सेल्फी घेण्याची इच्छा त्याने व्यक्त केली. यामुळे थोडं भीतीचं वातावरण झालं मात्र तमन्नाने स्वत: परिस्थिती सांभाळली.
तमन्नाने चाहत्याला निराश न करता त्याला सेल्फी दिला. तिच्या या कृतीमुळे सोशल मीडियावर तिचं कौतुक होतंय. तमन्ना लवकरच रजनीकांतसोबत 'जेलर' सिनेमात दिसणार आहे. यातील तिचं 'कावला' गाणं खूपच गाजतंय. १० ऑगस्टला सिनेमा रिलीज होतोय.