करण जोहरला लंडनमध्ये भेटला चाहता, व्हिडिओ ऑन करताच म्हणाला 'अंकल'!; Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 13:53 IST2024-07-29T13:53:21+5:302024-07-29T13:53:41+5:30
नुकताच करण लंडनमध्ये फेरफटका मारत असताना त्याला एक चाहता भेटला. पण तो चाहता त्याला चक्क 'अंकल' म्हणाला.

करण जोहरला लंडनमध्ये भेटला चाहता, व्हिडिओ ऑन करताच म्हणाला 'अंकल'!; Video व्हायरल
करण जोहर (Karan Johar) हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला सर्वात लोकप्रिय फिल्ममेकर आहे. धर्मा प्रॉडक्शन्स ही त्याची निर्मिती कंपनी आहे. 90 च्या दशकापासून तो एकापेक्षा एक सिनेमांची निर्मिती करत आहे. अनेक सुपरहिट सिनेमांचं त्याने दिग्दर्शनही केलं आहे. ५२ वर्षीय करणचे चाहते भारतातच नसून देशाबाहेरही आहेत. नुकताच करण लंडनमध्ये फेरफटका मारत असताना त्याला एक चाहता भेटला. पण तो चाहता त्याला चक्क 'अंकल' म्हणाला. यावर करणची काय रिअॅक्शन होती बघा.
करण जोहर काही दिवसांपासून लंडनमध्ये आहे. चित्रविचित्र फॅशन ही तर त्याची खासियतच आहे. लंडनच्या रस्त्यावरही करण शॉपिंग करत फिरत असताना व्हिडिओत दिसत आहे. तिकडे तो सुट्टी एन्जॉय करताना दिसतोय. तेवढ्यात एक इन्फ्लुएन्सर त्याला ओळखतो. तो विचार करतो की मी याला काय म्हणू, करण? केजो? मिस्टर करण, मिस्टर जोहर? नंतर तो करण जवळ जाऊन सेल्फी व्हिडिओ सुरु करतो. करणही त्याच्यासोबत कॅमेऱ्यासमोर पोज देतो. तेवढ्यात तो चाहता त्याला 'हाय अंकल' म्हणतो. हे ऐकताच करण शॉक होऊन म्हणतो, 'अंकल म्हणालास मला?' आणि तिथून निघून जातो.
करण जोहरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. zanethad नावाने या इन्फ्लुएन्सरचं हँडल आहे. त्याच्या व्हिडिोवर मजेशीर कमेंट्सही आल्या आहेत. 'नंतर करण परत येऊन बोलला का?' अशा प्रश्न एका विचारला. यावर इन्फ्लुएन्सर म्हणाला, 'हो, तो खूप चांगला आहे'.
करण जोहर 52 वर्षांचा आहे. त्याने काही वर्षांपूर्वी यश आणि रुही या जुळ्या मुलांना दत्तक घेतले. त्याच्या आईच्या मदतीने तो मुलांचा सांभाळ करतो. करणने गेल्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमाचं दिग्दर्शन केलं. त्याच्या आगामी सिनेमांची चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.