बिग बजेट चित्रपटांचा फ्लॉप शो; बॉक्स ऑफिसवर तीन दिवसही चालले नाही 'हे' चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 05:33 PM2023-10-02T17:33:41+5:302023-10-02T17:35:03+5:30

चित्रपटांच बजेट फार जास्त होतं. मात्र, ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाले.

A flop show of big budget films | बिग बजेट चित्रपटांचा फ्लॉप शो; बॉक्स ऑफिसवर तीन दिवसही चालले नाही 'हे' चित्रपट

A flop show of big budget films

googlenewsNext

बॉलिवूडमधील अनेक बड्या सुपरस्टार्सचे असे काही चित्रपट आहेत, ज्यांचं बजेट तर फार जास्त होतं. मात्र, ते बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झालेत. काही चित्रपटाचे बजेट तर 500 कोटी रुपये होते, परंतु तरीही ते बॉक्स ऑफिसवर काही कमाई करू शकले नाही. यात जास्त चित्रपट हे सुपरस्टार प्रभासचे आहे. प्रभास हा एक असा अभिनेता आहे, ज्याच्यावर निर्माते प्रचंड पैसा गुंतवायला तयार असतात आणि त्यांच्या अनेक चित्रपटांवर पैसे गुंतवलेतही. पण, त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालले नाही. तर नजर टाकूया पाच बिग बजेट फ्लॉप चित्रपटांवर...


 आदिपुरुष

 प्रभास, क्रिती सॅनन आणि सैफ अली खान यांच्या भूमिका असलेला आदिपुरुष हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला. या चित्रपटाचे बजेट सुमारे 500 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट केवळ 450 कोटींचा गल्ला जमवू शकला. शिवाय, या चित्रपटाला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं. 

 साहो

‘बाहुबली’फेम प्रभासचा बहुचर्चित ‘साहो’ चित्रपट येणार म्हटल्यावर त्याची भरपूर चर्चा होती. वाजत गाजत ‘साहो’ प्रदर्शित झाला; पण त्यानं प्रेक्षकांची साफ निराशा केली. साडेतीनशे कोटींचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकला नाही. मीडिया रिपोर्टनुसार,  2019 मध्ये रिलीज झालेल्या साहोचे बजेट 350 कोटी रुपये होते. पण, हा चित्रपट केवळ 420 कोटी रुपये कमवू शकला होता. 

राधे श्याम
 2022 चा हा चित्रपट दिग्दर्शित के.के. राधाकृष्ण कुमार यांनी दिग्दर्शन केले. प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली नाही. जवळपास 325 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर केवळ 156 कोटींची कमाई करू शकला होता. 

ठग्ज ऑफ हिंदोस्तान
"ठग्ज ऑफ हिंदोस्तान" हा चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. विजय कृष्ण आचार्य दिग्दर्शित. 310 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने केवळ 335 कोटींची कमाई केली. बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान, मेगास्टार अमिताभ बच्चन आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या. तगडी स्टारकास्ट असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करू शकला नाही. 

 सम्राट पृथ्वीराज
 अक्षय कुमारचा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला होता.  जवळपास 300 कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडाही गाठू शकला नाही.  यशराज सारखं मोठं प्रॉडक्शन हाऊस होतं आणि अक्षय कुमार, सोनु सुद, संजय दत्त, मानुषी छिल्लर सारखे कलाकार या चित्रपटामध्ये होते. तरी देखील हा चित्रपट फ्लॉप झाला. 

 

Web Title: A flop show of big budget films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.