स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा; Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 12:18 PM2024-02-06T12:18:18+5:302024-02-06T12:19:11+5:30

निक जोनासचे कुटुंब भारतीय पद्धतीचा आलिशान लग्नसोहळा पाहून चकित झाले होते.

A lavish wedding ceremony Nick Jonas was shocked after seeing so much bill | स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा; Video व्हायरल

स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा; Video व्हायरल

'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि निक जोनस *(Nick Jonas) यांच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत. 2018 मध्ये राजस्थानातील एका भव्य पॅलेसमध्ये दोघंही लग्नबंधनात अडकले. निक जोनास लोकप्रिय हॉलिवूड गायक आहे. निक जोनासचे कुटुंब भारतीय पद्धतीचा आलिशान लग्नसोहळा पाहून चकित झाले होते. लग्नाचा एकूण खर्च पाहून शॉक झालो होतो असा खुलासा त्याने नुकताच केला आहे. 

निक जोनास आपल्या दोन्ही भावांसोबत जेम्स कॉर्बिनच्या शोमध्ये गेला होता. यावेळी त्यांचा मजेशीर अंदाज पाहायला मिळाला. कारमध्ये बसलेल्या तीनही भावांना शोच्या होस्टने प्रश्न विचारले. तसंच एकाच्या उत्तरावर दोघांचंही तेच उत्तर असतं का हे बघण्यासाठी लाय डिटेक्टर लावलेलं होतं. यावेळी निकला विचारण्यात आलं, "तुझ्या लग्नात एवढे सगळे फंक्शन पाहून तुला असं वाटलं का की आता बस झालं हे लग्न?" यावर निक हसतच म्हणाला, "हो, विशेषत: बिल बघितल्यानंतर वाटलं."

त्याच्या या उत्तराने एकच हशा पिकतो. प्रियंका आणि निकच्या लग्नाचा एकूण खर्च तब्बल 3.5 कोटी रुपये होता. परदेशी पाहुण्यांना तर हे भव्य लग्न पाहून फार अप्रुप वाटलं होतं. निकच्या बाजूने अनेक पाहुणे खास या लग्नसोहळ्यासाठी भारतात आले होते. लग्नानंतर प्रियंका निकसोबत लॉस एंजिलिस येथे शिफ्ट झाला. तर 2022 मध्ये तिने सरोगसीच्या माध्यमातून लेकीला जन्म दिला. मालती मेरी असं तिचं नाव ठेवण्यात आलं. मालती मेरी काही महिन्यांपूर्वी पहिल्यांदा भारतात आली होती. तिच्या क्युटनेसवरुन कोणाच्याही नजरा हटत नव्हत्या. 

Web Title: A lavish wedding ceremony Nick Jonas was shocked after seeing so much bill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.