सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, रुमर्ड गर्लफ्रेंड युलियाने व्यक्त केली हळहळ, म्हणाली- तू नेहमी आमच्यासोबत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 16:20 IST2025-01-16T16:19:39+5:302025-01-16T16:20:38+5:30

Salman Khan : सलमान खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनेही पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे.

A mountain of grief fell on Salman Khan, rumored girlfriend Iulia expressed her grief, said - You are always with us... | सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, रुमर्ड गर्लफ्रेंड युलियाने व्यक्त केली हळहळ, म्हणाली- तू नेहमी आमच्यासोबत...

सलमान खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, रुमर्ड गर्लफ्रेंड युलियाने व्यक्त केली हळहळ, म्हणाली- तू नेहमी आमच्यासोबत...

बॉलिवूड अभिनेता सलमान खान(Salman Khan)ने त्याच्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. सध्या भाईजान त्याच्या आगामी सिकंदर या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला IMDb च्या टॉप मोस्ट अवेटेड चित्रपटांच्या यादीत प्रथम क्रमांक मिळाला आहे. या सगळ्या दरम्यान सलमान खानच्या घरातून एक वाईट बातमी येत आहे. त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याची गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिनेही पोस्ट करून शोक व्यक्त केला आहे.

सलमान खानचा लाडका कुत्रा टोरो याचे दुःखद निधन झाले आहे. अभिनेत्याची अफवा असलेली गर्लफ्रेंड युलिया वंतूर हिने तिच्या सोशल मीडिया हँडलवर खान कुटुंबाच्या लाडक्या कुत्र्यासोबतचा एक भावनिक व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली आहे. युलियाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, "आमच्या आयुष्यात आम्हाला आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद, माझ्या प्रिय टोरो बॉय... तू नेहमी आमच्यासोबत असेल."


पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये सलमान खानचे बिग बॉसच्या सेटवर, जिममध्ये आणि अगदी अभिनेत्याच्या पनवेल फार्महाऊसवर त्याच्या कुत्र्या टोरोसोबतचे काही संस्मरणीय क्षण दाखवले आहेत. अनेक फोटोंमध्ये, सलमानच्या डेस्कवर ठेवलेल्या हार्टच्या आकाराच्या फ्रेममध्ये टोरोच्या फोटोची झलकही पाहायला मिळाली.

सलमान खान टोरोसोबत शेअर करायचा फोटो
युलियाशिवाय सलमानही अनेकदा त्याच्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या कुत्र्याचे फोटो पोस्ट करतो. या बातमीनंतर चाहते आणि प्राणीप्रेमी देखील कमेंट करत आहेत आणि सुपरस्टारच्या कुत्र्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहेत. २०१९ मध्ये टोरोसोबतचा एक फोटो शेअर करत सलमान खानने लिहिले होते, "सर्वात प्रेमळ, निष्ठावान आणि निस्वार्थी प्रजातींसोबत वेळ घालवत आहे."

सलमान खान वर्कफ्रंट
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सलमान खान त्याचा आगामी चित्रपट सिकंदरच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा टीझरही अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आला. तेव्हापासून चाहते सिकंदरच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. २०२५च्या ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Web Title: A mountain of grief fell on Salman Khan, rumored girlfriend Iulia expressed her grief, said - You are always with us...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.