नवा ट्विस्ट! ललित मोदींसोबतच्या रिलेशनशीपनंतर सुष्मिता सेननं भाऊ राजीवला केलं Unfollow

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 12:23 PM2022-07-16T12:23:51+5:302022-07-16T12:24:43+5:30

Lalit Modi And Sushmita Sen:आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी सोशल मीडियावर सुष्मिता सेनसोबतच्या नात्याची कबुली दिल्यानंतर या दोघांच्या नात्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

A new twist! After her relationship with Lalit Modi, Sushmita Sen unfollowed her brother Rajiv | नवा ट्विस्ट! ललित मोदींसोबतच्या रिलेशनशीपनंतर सुष्मिता सेननं भाऊ राजीवला केलं Unfollow

नवा ट्विस्ट! ललित मोदींसोबतच्या रिलेशनशीपनंतर सुष्मिता सेननं भाऊ राजीवला केलं Unfollow

googlenewsNext

अभिनेत्री सुष्मिता सेन(Sushmita Sen)चे चाहते खूप खुश आहेत. ललित मोदीं(Lalit Modi)सोबतच्या त्यांच्या नात्याच्या बातम्या सध्या चर्चेत आहेत. सुष्मिता सेन ही फॅमिली लेडी आहे. अभिनेत्रीला कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवायला आवडते. सुष्मिता सेन अनेकदा तिचा भाऊ राजीव सेन(Rajiv Sen)सोबत दुबईमध्ये व्हेकेशन एन्जॉय करताना दिसतात, पण तुम्हाला माहिती आहे का की सुष्मिता सेन तिचा भाऊ राजीव सेन इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही. माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन वहिनी चारू असोपाला फॉलो करते. मात्र, चारू आणि राजीव आता घटस्फोट घेणार आहेत. चारू असोपाने काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हे वृत्त सांगितले होते.

'मेरे अंगने में' फेम चारू असोपाने काही दिवसांपूर्वीच राजीव सेनसोबतच्या वैवाहिक आयुष्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले होते. तिला राजीव सेनपासून घटस्फोट हवा आहे, अशी इच्छा तिने व्यक्त केली होती. त्याचवेळी राजीव सेनच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नजर टाकली तर त्याने बहीण सुष्मिता सेन आणि पत्नी चारू असोपा यांना अनफॉलो केले आहे. राजीव ललित मोदींना फॉलो करतो.


गुरुवारी ललित मोदींनी सुष्मिता सेनसोबतच्या नात्याच्या बातम्यांना पुष्टी देणारी पोस्ट शेअर केली. दोघांच्या या पोस्टमध्ये अनेक रोमँटिक फोटोही पाहायला मिळाले. ललित मोदींनी पोस्टमध्ये लिहिले की, मी जागतिक दौऱ्यावरून लंडनला परत आलो आहे. मी कुटुंबासह मालदीव आणि सार्डिनियाला गेलो होतो. मी नवीन जीवन आणि नवीन सुरुवात याबद्दल खूप आनंदी आहे. सुष्मिता सेन आणि मला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.


या बातमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना अभिनेत्रीचा भाऊ राजीव सेनने इंडिया टुडेला सांगितले की, माझ्या बहिणीच्या डेटींगची बातमी ऐकून मला धक्का बसला. मलाही त्याबद्दल माहिती नव्हते. मी माझ्या बहिणीशी याबद्दल बोलेन, त्यानंतरच मी काही बोलू शकेन. 

Web Title: A new twist! After her relationship with Lalit Modi, Sushmita Sen unfollowed her brother Rajiv

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.