'खल्लास गर्ल' फेम ईशा कोप्पिकरच्या घरी आला छोटा पाहुणा, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 18:37 IST2023-06-24T18:36:55+5:302023-06-24T18:37:21+5:30
Isha Koppikar Video: ईशा कोप्पीकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने तिच्या घरी आलेल्या छोट्या पाहुण्याची झलक दाखवली आहे.

'खल्लास गर्ल' फेम ईशा कोप्पिकरच्या घरी आला छोटा पाहुणा, व्हिडीओ शेअर करत दिली गुडन्यूज
बॉलिवूड अभिनेत्री ईशा कोप्पीकर (Isha Koppikar) सध्या सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे. पण ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती दररोज सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. तिच्या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. दरम्यान आता ईशाने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. ईशा दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. ज्याची झलकही चाहत्यांना सोशल मीडियावर दाखवण्यात आली आहे.
ईशा कोप्पीकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या घरी आलेल्या छोट्या पाहुण्याची झलक दाखवली आहे. व्हिडीओमध्ये ईशा पहिल्या सोनोग्राफीचा फोटो दाखवते. त्यानंतर ती तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. सोनोग्राफीचा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना ईशा प्रेग्नंट असल्याचे वाटत आहे. उलट तसे नाही. ती गरोदर नाही, तिने कुत्र्याचे गोंडस पिल्लू तिच्या पोटात लपवले आहे. जी ती तिच्या टी-शर्टच्या आतून बाहेर काढते. ती त्याला प्रेमाने आपल्या कुशीत घेते. ईशाची मुलगीही त्याच्यासोबत खेळताना दिसत आहे. व्हिडीओ शेअर करत ईशाने लिहिले की मी तुम्हा सर्वांपासून गुड न्यूज लपवून ठेवत होते. पण मला ते फार काळ लपवता आले नाही.
चाहत्यांनी केले अभिनंदनांचा वर्षाव
ईशाच्या या पोस्टवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. तिचे अभिनंदन करत आहे. एका चाहत्याने लिहिले की, अभिनंदन. पेढा कोण खाऊ घालणार? तर दुसर्या चाहत्याने लिहिले की मॅडम, एक नवीन सदस्य आला आहे. ईशाने २००९ मध्ये टिमी नारंगशी लग्न केले होते. त्यांना एक मुलगी देखील आहे जिला ईशाने २०१४ मध्ये जन्म दिला. ईशा आता दुसऱ्यांदा आई झाली आहे. त्यांच्या घरी एक कुत्र्याचे गोंडस पिल्लू आले आहे.