'लग्नाला येताय, पण..'; आयराच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी आमिरची विशेष सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2023 03:00 PM2023-12-21T15:00:21+5:302023-12-21T15:01:45+5:30

Ira khan: या पत्रिकेत आमिरने दिलेल्या स्पेशल नोटमुळे ही पत्रिका चर्चेत आली आहे.

aamir-khan-26-year-old-daughter-ira-khan-getting-married-wedding-card-viral-marriage-first-photo | 'लग्नाला येताय, पण..'; आयराच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी आमिरची विशेष सूचना

'लग्नाला येताय, पण..'; आयराच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी आमिरची विशेष सूचना

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अर्थात आमिर खान (aamir khan) याची लेक लवकरच लग्नाच्या बंधनात अडकली जाणार आहे.  येत्या १३ जानेवारी रोजी आयरा (ira khan) तिच्या प्रियकरासोबत नुपूर शिखरेसोबत (nupur shikhare)  लग्न करणार आहे. त्यामुळे या दोन्ही कुटुंबामध्ये सध्या लग्नाची गडबड सुरु झाली आहे. या गडबडीमध्येच आयरा आणि नुपूरच्या लग्नाची पत्रिका व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे या पत्रिकेत आमिरने दिलेल्या स्पेशल नोटमुळे ही पत्रिका चर्चेत आली आहे.

साधारणपणे बॉलिवूडसेलिब्रिटींचा लग्नसोहळा हा एखाद्या मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नसतो. त्यामुळे त्यांची लग्नपत्रिकाही तितकीच खास असते. यात अनेक कलाकार त्यांच्या लग्नपत्रिकेवर पाण्यासारखा पैसा खर्च करतात. परंतु, आमिरच्या लेकीची लग्नपत्रिका अत्यंत साधी असल्याचं दिसून येतं. इतकंच नाही तर या पत्रिकेत लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांसाठीही खास नोट लिहिली आहे.

नेमकं काय आहे या पत्रिकेतील नोट?

या लग्नपत्रिकेत आमिरने एक खास नोट लिहिली आहे. त्यानुसार, लग्नाला उपस्थित राहणाऱ्या कोणत्याही पाहुण्यांनी येतांना आहेर आणायचा नाहीये. त्यामुळे या लग्नात आहेर देण्याऐवजी नववधू-वरांना शुभाशिर्वाद द्या, असं नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयरा आणि नुपूर यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. अलिकडेच या जोडीच्या केळवणाचाही कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात आयराने मराठमोळ्या पद्धतीने लूक केला होता. इतकंच नाही तर तिने नुपूरसाठी मराठीत उखाणाही घेतला होता. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावरही कमालीचा व्हायरल झाला होता.

Web Title: aamir-khan-26-year-old-daughter-ira-khan-getting-married-wedding-card-viral-marriage-first-photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.