"माझ्या कमी उंचीमुळे भीती वाटायची की.."; आमिर खानचा खुलासा, नाना पाटेकर म्हणाले- "माझा चेहरा.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 14:06 IST2024-12-25T14:06:11+5:302024-12-25T14:06:45+5:30

आमिर खान-नाना पाटेकर या दोघांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झालीय. या मुलाखतीत आमिर-नानांनी एकमेकांशी खास संवाद साधला

aamir khan afraid about his height in bollywood talk with nana patekar vanvaas movie | "माझ्या कमी उंचीमुळे भीती वाटायची की.."; आमिर खानचा खुलासा, नाना पाटेकर म्हणाले- "माझा चेहरा.."

"माझ्या कमी उंचीमुळे भीती वाटायची की.."; आमिर खानचा खुलासा, नाना पाटेकर म्हणाले- "माझा चेहरा.."

नाना पाटेकरांच्या 'वनवास' सिनेमाची सध्या सर्वांना चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमातील नाना पाटेकरांच्या अभिनयाची सध्या चांगलीच चर्चा होतेय. या सिनेमाच्या निमित्ताने नाना यांनी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत पॉडकास्ट केलं. सुरुवातीला नानांनी त्यांचा खास मित्र अनिल कपूर यांच्यासोबत पॉडकास्ट करुन खास खुलासे केले. आता नानांनी नुकतंच अभिनेता आमिर खानसोबत खास मुलाखत केली. तेव्हा आमिर नानांंसमोर विविध विषयांवर व्यक्त झाला.

आमिरला वाटायची उंचीची भिती

आमिर खान नाना पाटेकरांशी संवाद साधताना दिसला. आमिरला कोणत्या गोष्टीची इनसिक्यूरिटी आहे असं विचारताच आमिर म्हणाला, "मला एक भीती होती. मला वाटलं होतं की लोक माझ्या उंचीमुळे माझा स्वीकार करणार नाहीत तर माझं  काय होईल? कारण तेव्हा जे नट होते त्यांच्या तुलनेत माझी उंची कमी होती. पण नंतर मला जाणीव झाली की या गोष्टी महत्वाच्या नसतात. परंतु त्यावेळी मात्र मनात या कमी  उंचीच्या भीतीने घर केलं होतं."

नाना पाटेकरांनी आमिरला दिलं हे उत्तर

आमिरचं म्हणणं ऐकून नाना पाटेकर त्याला म्हणाले की, "माझा चेहरा बघ. मी या चेहऱ्यासोबत ५० वर्ष काम करु शकतो." आमिर पुढे म्हणाला की, सुरुवातीला ज्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याच्या आयुष्यात तणाव होता त्या गोष्टींमुळे स्वतःला त्रास करुन घेणं आमिरने नंतर बंद केलं. आपण करत असलेलं काम सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे नंतर आमिरने स्वतःला त्रास करुन घेणं कमी केलं. नाना पाटेकरांचा 'वनवास' सिनेमा सध्या थिएटरमध्ये प्रदर्शित झालाय. आमिर लवकरच 'सितारे जमीन पर' सिनेमातून भेटीला येणार आहे.

Web Title: aamir khan afraid about his height in bollywood talk with nana patekar vanvaas movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.