आमिर खानच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एन्ट्री? कुटुंबाशीही करुन दिली ओळख; कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 11:57 IST2025-02-01T11:54:45+5:302025-02-01T11:57:34+5:30
आमिर खानच्या आयुष्यात आलेली ही 'मिस्ट्री वुमन' कोण?

आमिर खानच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एन्ट्री? कुटुंबाशीही करुन दिली ओळख; कोण आहे ती?
आमिर खान (Aamir Khan) ९० च्या दशकापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. चार्मिंग व्यक्तिमत्व आणि 'परफेक्शनिस्ट' अशी त्याची ओळख आहे. गेल्या ४० वर्षांपासून तो सिनेसृष्टीत कार्यरत आहे आणि एकापेक्षा एक ब्लॉकबस्टर सिनेमे देत आहे. 'कयामत से कयामत तक', 'रंग दे बसंती', 'दिल चाहता है' सारख्या सिनेमातून त्याने प्रेक्षकांवर छाप पाडली. आमिरचं प्रोफेशनल आयुष्य तर सर्वांनाच माहित आहे. मात्र त्याच्या वैयक्तिक आयुष्याचीही जोरदार चर्चा होते. आमिरचा आधीच दोनदा घटस्फोट झाला असून आता त्याच्या आयुष्यात तिसऱ्या मुलीची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे.
'फिल्मफेअर' ने दिलेल्या रिपोर्टनुसार, आमिर खानच्या आयुष्यात मिस्ट्री वुमन आली आहे. ती बंगळुरुची आहे. अभिनेत्याच्या निकटवर्तियाकडून हा खुलासा करण्यात आला आहे. सध्या आमिर आपल्या गर्लफ्रेंडबद्दल काहीही सांगू इच्छित नाही. सर्वांनी त्याच्या प्रायव्हसीचा सम्मान करावा. तो या रिलेशनशिपध्ये खूप सीरियस आहे. त्याने या मिस्ट्री वुमनची भेट कुटुंबातील सदस्यांशीही करुन दिली आहे. कुटुंबाशी भेटही चांगली झाल्याची माहिती आहे.
या रिपोर्टनंतर ही बातमी आता वाऱ्यासारखी पसरली आहे. आमिर तिसऱ्यांदा लग्न करणार अशीही एक चर्चा सुरु झाली आहे. एका मुलाखतीत तो म्हणाला होता की, "मी आता ५९ वर्षांचा आहे. आता या वयात मी कुठे परत लग्न करु. मला तरी अवघड दिसतंय." याशिवाय आमिरने तो खऱ्या आयुष्यात रोमँटिक असल्याचंही वक्तव्य केलं होतं. त्यामुळे आता त्याच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चा कितपत खऱ्या ठरताएत हे लवकरच कळेल.
१९८६ साली आमिर खानचं रिना दत्ताशी लग्न झालं होतं. ती त्याची बालमैत्रीण होती. दोघांनी १६ वर्षांनी घटस्फोट घेतला होता. नंतर आमिरने २००५ साली दिग्दर्शिका किरण रावशी लग्नगाठ बांधली. 'लगान' च्या सेटवरच ते भेटले होते. मात्र किरणसोबतही त्याचा घटस्फोट झाला. यांचंही लग्न १६ वर्ष टिकलं. आमिर खान पहिल्या पत्नीपासून आयरा आणि जुनैद ही दोन मुलं आहेत. तर दुसऱ्या पत्नीपासून त्याला आझाद हा मुलगा आहे.
आमिर खान आगामी 'सितारे जमीन पर' सिनेमात दिसणार आहे. 'लाल सिंग चड्डा' फ्लॉप झाल्यानंतर आमिरने काही काळ ब्रेक घेतला होता. सिनेमाच्या अपयशाने तो दुखावला गेला होता. आता सितारे जमीन पर मधून तो कमबॅक करणार आहे. तसंच 'लाहोर १९४७' सिनेमाचीही तो निर्मिती करत आहे.