"सब इंसान हैं, गलतियां हमसे ही होती हैं..",लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने जोडले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 10:49 AM2022-09-01T10:49:06+5:302022-09-01T12:10:00+5:30

बॉक्स ऑफिसवर 'लाल सिंग चड्ढा' आपटला आहे यानंतर आमिर खानने हात जोडून लोकांची माफी मागितली आहे. त्याने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Aamir khan apologizes after Laal Singh Chaddha debacle says michhami dukkadam | "सब इंसान हैं, गलतियां हमसे ही होती हैं..",लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने जोडले हात

"सब इंसान हैं, गलतियां हमसे ही होती हैं..",लाल सिंग चड्ढा फ्लॉप झाल्यानंतर आमिर खानने जोडले हात

googlenewsNext

आमिर खानचा 'लाल सिंह चड्ढा' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे फ्लॉप ठरला. सुमारे 180 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट आपला खर्चही वसूल करू शकला नाही. 11 ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या 'लाल सिंह चड्ढा'च्या निर्मात्यांना सुमारे 100 कोटींचा फटका बसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आमिर खानने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्याने आपल्या चुकांसाठी चाहत्यांची माफी मागितली आहे आणि म्हटले आहे की, 'आपण सर्व माणसं आहोत आणि चुका आपल्याकडून होत असतात.'

का म्हणाला आमिर खान, 
आज पर्यूषण पर्व शेवटचा दिवस आहे. यादिवशी मिच्छामि दुक्कड़म् म्हणून एकमेकांची क्षमा मागितली आहे. 
 या दिवशी लोक 'मिछमी दुक्कडम' म्हणत आपल्या चुकांची माफी मागतात. या दिवशी आमिरने आपल्या चुकांची माफीही मागितली आहे. आमिर गेल्या काही काळापासून त्याच्या चित्रपटामुळे आणि काही जुन्या वक्तव्यांमुळे लोकांच्या निशाण्यावर आला आहे. Laal Singh Chaddhaचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून, आमिर खानच्या जुन्या विधानांवरून ट्विटरवर लोकांनी चित्रपटावर बॉयकॉट टाकण्यास सुरुवात केली.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेक ठिकाणी विरोध झाला. आपल्या चित्रपटावर बहिष्कार घालू नये, असे आवाहनही आमिर खानने लोकांना वारंवार केलं. पण तरीही 'लाल सिंह चड्ढा' रिलीजच्या पहिल्या आठवड्यात 50 कोटींची कमाई करू शकला नाही.

चित्रपटाचे नकारात्मक प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आमिर खानने आता चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याने एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, 'आपण सगळे माणूस आहोत आणि चुका आपल्याकडून होत असतात. कधी शब्दातून...कधी कृतीतून...कधी नकळत. कधी रागात तर कधी विनोदात. कधीही न बोलून. माझ्यामुळे तुमचं मनं दुखावलं गेलं असेल तर मी तुमची माफी मागतो. मिच्छमी दुक्कडम.'
 

Web Title: Aamir khan apologizes after Laal Singh Chaddha debacle says michhami dukkadam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.