आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, त्याची 'सावली' संबोधल्या जाणाऱ्या व्यक्तीचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 10:25 AM2020-05-13T10:25:54+5:302020-05-13T10:26:20+5:30

अभिनेता आमिर खानने त्याच्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. 

Aamir Khan assistant amos passed away tJl | आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, त्याची 'सावली' संबोधल्या जाणाऱ्या व्यक्तीचं निधन

आमिर खानवर कोसळला दुःखाचा डोंगर, त्याची 'सावली' संबोधल्या जाणाऱ्या व्यक्तीचं निधन

googlenewsNext

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आमिर असा कलाकार आहे जो फार कमी लोकांवर विश्वास ठेवतो आणि फार कमी व्यक्तींना आपल्या जीवनात जवळीक साधण्याची संधी देतो. अशा व्यक्तींपैकी एक व्यक्ती म्हणजे आमोस. फार कमी लोकांना आमोस यांच्या आडनावाबद्दल माहित आहे. ते सिनेइंडस्ट्रीत याच नावाने ओळखले जात होते. आमोस यांना आमीर खानची सावली म्हटले जात होते. आमोस यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.  

इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, अमोस हे गेल्या २५ वर्षांपासून आमिरसोबत काम करत होते. त्यांचे हृदयविकाराचा झटक्यामुळे निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. अमोस यांच्यावर होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.  अमोस यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि दोन मुले, सुना असा परिवार आहे.  


‘लगान’ चित्रपटात आमिरसोबत झळकलेल्या अभिनेता करीम हाजी यांनी अमोसच्या निधनाची माहिती दिली. सकाळी ११.३० वाजता अमोस अचानक जमिनीवर पडले. त्यानंतर आमिर आणि किरण रावने तातडीने त्याला रुग्णालयात नेले.
करीम हाजी यांनी सांगितले की, अमोस हे अत्यंत साधे व्यक्ती होते. एका सुपस्टारसोबत काम करत असल्याचा गर्व त्याला कधीच नव्हता. त्यांना कोणता आजारही नव्हता. त्यामुळे त्यांच्या अशा अचानक झालेल्या निधनामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. तसेच आमिरने त्याच्या जवळची व्यक्ती गमावल्यामुळे किरण आणि तो दोघेही खूप दु:खी आहेत.

Web Title: Aamir Khan assistant amos passed away tJl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.