'सरफरोश'च्या स्क्रीनिंगला आमिर खानसोबत 'गजनी'ला पाहून चाहते खूश, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 12:14 PM2024-05-11T12:14:54+5:302024-05-11T12:15:49+5:30

संजय सिंघानिया आमि 'गजनी' दिसले एकत्र

Aamir Khan attends Sarfarosh Silver jubilee special screening reunited with Ghajini actor Pradeep Rawat | 'सरफरोश'च्या स्क्रीनिंगला आमिर खानसोबत 'गजनी'ला पाहून चाहते खूश, Video व्हायरल

'सरफरोश'च्या स्क्रीनिंगला आमिर खानसोबत 'गजनी'ला पाहून चाहते खूश, Video व्हायरल

बॉलिवूडचा 'परफेक्शनिस्ट' आमिर खानच्या (Aamir Khan) सुपरहिट चित्रपटांपैकी एक म्हणजे 'सरफरोश'. या सिनेमाला नुकतीच 25 वर्ष झाली. यानिमित्त मुंबईत सिनेमाची स्पेशल स्क्रीनिंग ठेवण्यात आली होती. सिनेमाची संपूर्ण स्टारकास्ट यावेळी उपस्थित होती. 'गजनी' सिनेमातील खलनायक प्रदीप रावतही स्क्रीनिंगला हजर होता. आमिरने मागून येऊन त्याला सरप्राईज दिलं आणि दोघांनी गळाभेट घेतली. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'सरफरोश' च्या सिल्व्हर ज्युबिलीनिमित्त काल संपूर्ण स्टारकास्ट एकत्र आली. सोनाली बेंद्रे आणि आमिर खानसोबतच इतरही उपस्थित होते. सरफरोश आणि गजनी अशा दोन्ही सिनेमात आमिर खानसोबत काम केलेले अभिनेते प्रदीप रावत यावेळी पापाराझींशी बोलत होते. तेव्हा आमिर अचानक मागून आला आणि त्याने प्रदीप रावत यांच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा प्रदीप यांनी मागे वळून बघितलं. आमिरला बघून तेही खूश झाले. आमिर लगेच तिथून पुढे जाणार असतो पण प्रदीप रावत त्याला हाताने धरुन थांबवतात. त्यांचा हा खेळकर अंदाज सोशल मीडियार व्हायरल होतोय.

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही 'गजनी'चे दिवस आठवले. अनेकांनी हार्ट इमोजी कमेंट केल्या. २००८ साली 'गजनी'रिलीज झाला होता. या सिनेमालाही १६ वर्ष झाली. दरम्यान आमिर खानने 'सरफरोश 2'ची घोषणा केली आहे. आमिर खान पुन्हा ACP अजय सिंह राठोडच्या भूमिकेत पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Aamir Khan attends Sarfarosh Silver jubilee special screening reunited with Ghajini actor Pradeep Rawat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.