स्वाइन फ्लूवर मात करून आमिर खान परतला कामावर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 05:15 PM2017-08-24T17:15:14+5:302017-08-24T22:45:14+5:30

स्वाइन फ्लू या भयानक आजारावर मात करून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागला आहे. ...

Aamir Khan is back at work by overcoming swine flu! | स्वाइन फ्लूवर मात करून आमिर खान परतला कामावर!

स्वाइन फ्लूवर मात करून आमिर खान परतला कामावर!

googlenewsNext
वाइन फ्लू या भयानक आजारावर मात करून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा नव्या दमाने कामाला लागला आहे. बºयाच काळानंतर आमिर एका पब्लिक इव्हेंटमध्ये बघावयास मिळाला. गेल्या काही महिन्यांपासून आमिर आणि त्याची पत्नी किरण राव स्वाइन फ्लू या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे हे दोघे कुठेही सार्वजनिक कार्यक्रमात बघावयास मिळत नव्हते. परंतु आता आमिर एका इव्हेंटमध्ये बघावयास मिळाल्याने त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचा अंदाज लावला जात आहे. शिवाय आमिर चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. 

पुणे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी स्वाइन फ्लू या आजाराने ग्रस्त असल्याचे म्हटले होते. आमिरची ही बातमी वाºयासारखी पसरली होती. चाहत्यांकडून त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून आराम करण्याचा सल्ला दिला जात होता. आमिर आणि त्याची पत्नी किरण यांनीदेखील बरेच दिवस स्वत:ला घरामध्ये एकप्रकारे कोंडून घेतले होते. 

आता या दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा झाली असून, पुन्हा एकदा आमिर कामावर परतला आहे. दरम्यान, बºयाच काळानंतर सार्वजनिक इव्हेंटमध्ये सहभागी झालेल्या आमिरने त्याच्या आगामी ‘सीक्रेट सुपरस्टार’ या चित्रपटातील ‘मैं कौन हूं’ हे गाणेही गायिले. या चित्रपटाची निर्मिती त्याच्या होम प्रॉडक्शन अंतर्गत करण्यात आली आहे. चित्रपट एका १४ वर्षांच्या मुलीच्या गायक बनण्याच्या स्वप्नावर आधारित आहे. या व्यतिरिक्त आमिर त्याच्या बिग बजेट ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्येही व्यस्त आहे. 

Web Title: Aamir Khan is back at work by overcoming swine flu!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.