आमिर खानने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, उत्तर प्रदेशात आहेत २२ घरे; एकूण संपत्ती माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 09:20 AM2024-06-28T09:20:11+5:302024-06-28T09:20:43+5:30

मुंबईतील पाली येथील एका बिल्डिंगमध्ये त्याने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. आमिरने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत ९ कोटींपेक्षा अधिक आहे.

Aamir Khan buys flat in mumbai worth rs 9cr do you know his net worth property details | आमिर खानने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, उत्तर प्रदेशात आहेत २२ घरे; एकूण संपत्ती माहितीये का?

आमिर खानने मुंबईत खरेदी केला ९ कोटींचा फ्लॅट, उत्तर प्रदेशात आहेत २२ घरे; एकूण संपत्ती माहितीये का?

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमिरने मुंबईत फ्लॅट खरेदी केला आहे. मुंबईतील पाली येथील एका बिल्डिंगमध्ये त्याने आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. आमिरने खरेदी केलेल्या या फ्लॅटची किंमत ९ कोटींपेक्षा अधिक आहे. स्क्वेअर यार्ड्स डॉट कॉमनुसार आमिरच्या नावावर ही प्रॉपर्टी आहे. याची किंमत सुमारे ९.७५ कोटींच्या घरात आहे. 

आमिरने मुंबईत खरेदी केलेला फ्लॅट हा जवळपास १०२७ स्क्वेअर फूट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, २५ जूनला आमिरने हा फ्लॅट खरेदी केला आहे. पालीमधील बेला विस्ता अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये त्याने हा फ्लॅट खरेदी केल्याची माहिती आहे. या बिल्डिंगमध्येच आमिरच्या नावे आणखी प्रॉपर्टीदेखील आहे. याशिवाय पालीमधील मरीना अपार्टमेंटमध्येही त्याचा फ्लॅट आहे. 

आमिरचा मुंबईतील वांद्रे येथे सी फेसिंग फ्लॅट आहे. हा फ्लॅट ५ हजार स्क्वेअर जागेत पसरलेला आहे. त्याचा हा फ्लॅट दोन मजली आहे. याशिवाय आमिरचा पंचगनीमध्येदेखील एक फार्महाऊस आहे. २०१३मध्ये त्यांनी ७ कोटींना हा फार्महाऊस खरेदी केला होता. २ एकर परिसरात हा फार्महाऊस पसरलेला आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार, आमिरने उत्तर प्रदेशमध्येदेखील काही प्रॉपर्टी खरेदी केली आहे. जवळपास २२ घर त्याच्या नावावर असल्याची माहिती आहे. आमिर खानचं एकूण नेटवर्थ जवळपास १ हजार ८६२ कोटींच्या घरात आहे. 
 

Web Title: Aamir Khan buys flat in mumbai worth rs 9cr do you know his net worth property details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.