Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 12:05 PM2024-10-23T12:05:24+5:302024-10-23T12:06:19+5:30

Dangal And Babita Phogat : बबिता फोगाटने आता दंगल चित्रपटातून आपल्या कुटुंबाला नेमके किती पैसे मिळाले याबाबत एक मोठा खुलासा केला आहे.

Aamir Khan Dangal film earned rs 2000 crores phogat sister family got only 1crore Babita Phogat reveals in interview | Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा

Babita Phogat : "'दंगल'ने २००० कोटी कमावले, पण माझ्या कुटुंबाला फक्त..."; बबिता फोगाटचा मोठा खुलासा

आमिर खानच्या 'दंगल' हा चित्रपटाची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली होती. तसेच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई केली होती. दंगलने रेकॉर्ड ब्रेक करत २००० कोटींचा गल्ला जमवला होता. बबिता फोगाटने आता दंगल चित्रपटातून आपल्या कुटुंबाला नेमके किती पैसे मिळाले याबाबत एक मोठा खुलासा केला आहे. जो ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. 

फोगाट कुटुंबीयांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित असलेल्या या चित्रपटाने जगभरात तब्बल २००० कोटी रुपये कमावले. बबिताने खुलासा केला आहे की, त्यांच्या कुटुंबीयांना फक्त १ कोटी रुपये मिळाले. एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बबिताने हे सांगितलं आहे. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचा देखील यावर सुरुवातीला विश्वासच बसला नाही. 

दोन हजार कोटी रुपयांपैकी तुम्हाला फक्त एक कोटी रुपयेच मिळाले का? असा प्रश्न त्याने पुन्हा विचारला तेव्हा बबिताने मान हलवत हो असं म्हटलं. चित्रपटाने एवढी मोठी कमाई केल्यानंतरही कमी पैसे मिळाले याचं वाईट वाटतं का? असा प्रश्न विचारल्यानंतर बबिताने 'नाही' असं म्हटलं. तसेच "बाबांनी (महावीर फोगाट) एक गोष्ट सांगितली होती की, लोकांचं प्रेम आणि आदर पाहिजे" असं म्हटलं आहे. 

२३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेल्या दंगल या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं होतं. अभिनेता आमिर खानने बबिताचे वडील महावीर फोगाट यांची भूमिका साकारली होती. तसेच आमिर या चित्रपटाचा सहनिर्मितासुद्धा होता. महावीर फोगाट यांनी आपल्या मुलींना कसं कुस्तीचं प्रशिक्षण दिलं आणि कुस्ती विश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली, याविषयीची कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

Web Title: Aamir Khan Dangal film earned rs 2000 crores phogat sister family got only 1crore Babita Phogat reveals in interview

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.