'तिला हात लावलास तर...'; आयरा खानच्या चाहत्याने दिली तिच्या प्रियकराला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 14:50 IST2022-01-17T14:49:40+5:302022-01-17T14:50:25+5:30
Ira khan: अलिकडेच आयराचा प्रियकर नुपूर शिखरे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याला आलेला धमकीचा मेसेज नेटकऱ्यांना दाखवला आहे.

'तिला हात लावलास तर...'; आयरा खानच्या चाहत्याने दिली तिच्या प्रियकराला धमकी
अभिनेता आमिर खानची (amir khan) लेक आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर कायमच अॅक्टीव्ह असल्याचं पाहायला मिळतं. आयरा अनेकदा तिच्या जीवनातील लहान लहान किस्से किंवा अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असते. त्यामुळे आज सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे आयराच्या एका चाहत्याने तिचा प्रियकर नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) चक्क धमकी दिली आहे.
अलिकडेच आयराचा प्रियकर नुपूर शिखरे याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याने त्याला आलेला धमकीचा मेसेज नेटकऱ्यांना दाखवला आहे. सोबतच ही धमकी देणाऱ्याला मजेशीर अंदाजात उत्तरही दिलं आहे. "आयरावर माझं प्रेम आहे. त्यामुळे तिला हात लावू नकोस", असा धमकीचा मेसेज नुपूरला एका व्यक्तीने पाठवला आहे.
नुपूरला हा मेसेज मिळाल्यानंतर त्याने मजेशीर अंदाजात त्या मेसेजचा रिप्लाय दिला आहे. नुपूर एका सोफ्यावर बसला असतो. तर, त्याच्या बाजूला एका खुर्चीवर आयरा बसून कम्प्युटरवर काही तरी काम करत असते. तिला असं काम करतांना पाहून नुपूर मुद्दाम तिच्या जवळ जातो आणि तिला हात लावतो. त्यानंतर परत थोड्या वेळाने येतो आणि तिच्या गालावर किस करतो.
दरम्यान, हा व्हिडीओ शेअर करत नुपूरने दिलेलं कॅप्शन अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘यू कांट टच धिस’ चे लिरिक्स नुपूरने या कॅप्शनमध्ये वापरले आहेत. आयरा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून अलिकडेच तिने जाहीरपणे नुपूरसोबत असलेल्या प्रेमाची कबुली दिली होती. नुपूर आयराचा फिटनेस ट्रेनरदेखील आहे.